देशातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचं गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसून येतंय. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी आढळलेल्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीत किंचीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. मात्र आकडेवारीतील हा किरकोळ बदल असून चिंता करण्याएवढा फरक नसल्याचं सांगितलं जातंय. ज्या दिवशी अधिक टेस्ट होतात, त्या दिवशी आकडे वाढतात, असा अनुभव आहे.
देशात गेल्या २४ तासात ६७, ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर १३३२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत. गेल्या २ दिवसांत हे काहीसे वाढलेले असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचं दिसतंय. गेल्या बुधवारी देशात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या होती ९० हजार. त्या तुलनेत या आठवड्यातील नव्या रुग्णांची संख्या ७० हजारांच्या आत आहे.
दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेसाठीची तयारी सरकारनं सुरू केलीय. सध्या धुमाकूळ घालणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटनंतर आता डेल्टा प्लस हा अतिभयंकर व्हेरिअंट आल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याविरुद्ध लढण्यासाठी यंत्रणा सज्ज होत आहेत. हा व्हायरस थेट रोगप्रतिकारक क्षमतेवरच हल्ला करत असल्याचं दिसून आल्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी अधिक काळजी घेणं, गरजेचं असल्याचं सांगितलं जातंय. [read_also content=”मुंबईतील तंत्रज्ञाची कमाल; तयार केला कोरोना रुग्णांवर उपचार करणार रोबो https://www.navarashtra.com/latest-news/mumbais-technician-max-created-robot-to-treat-corona-patients-nrvk-143396.html”]
देशात लसीकरणाचा गेल्या काही आठवड्यांत मंदावलेला वेग लवकरच वाढेल आणि लसीकरणाचे चाक पुन्हा रुळावर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. देशात