Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्युकरमायकोसिसचा मृत्यदर कोरोनाच्या तुलनेेत सहापट; जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालातून खुलासा

विदर्भातील (Vidarbha) कोरोनासह (Corona) म्युकर मायकोसिसचे (mucosalmycosis) (काळी बुरशी) (black fungus) सर्वाधिक रुग्ण (Patient) व मृत्यू (Death) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) नोंदवण्यात आले आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 02, 2021 | 08:51 PM
म्युकरमायकोसिसचा मृत्यदर कोरोनाच्या तुलनेेत सहापट; जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालातून खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  विदर्भातील (Vidarbha) कोरोनासह (Corona) म्युकर मायकोसिसचे (mucosalmycosis) (काळी बुरशी) (black fungus) सर्वाधिक रुग्ण (Patient) व मृत्यू (Death) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) नोंदवण्यात आले आहेत. नागपुरात कोरोनाच्या आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर १.५९ टक्के असतानाच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर सहा पट म्हणजेच ९.५७ टक्के आहे.

[read_also content=”Nagpur corona update नागपुरात शुक्रवारी आढळले ३० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण; मृत्यूसंख्या शून्यावरच https://www.navarashtra.com/latest-news/30-corona-positive-patients-found-in-nagpur-on-friday-the-death-toll-is-zero-nrat-150116.html “]

जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ४ लाख ७७ हजार ५२ रुग्ण आढळले. त्यात शहरातील ३ लाख ३२ हजार ५१३, ग्रामीणचे १ लाख ४२ हजार ९३३, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६०६ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ९ हजार २५ रुग्णांचा (१.८९ टक्के) मृत्यू झाला. त्यात शहरातील ५ हजार २९५ (१.५९ टक्के), ग्रामीणचे २ हजार ३०६ (१.६१ टक्के), जिल्ह्याबाहेरील १ हजार ४२४ रुग्णांचा समावेश होता.

[read_also content=”नागपूर/ भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू; चार ठिकाणी होणार ‘क्लिनिकल ट्रायल’ https://www.navarashtra.com/latest-news/bharat-biotech-launches-kovacin-vaccine-on-young-children-clinical-trials-to-be-held-at-four-places-nrat-149943.html”]

जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६७ हजार ६९१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यात शहरातील ३ लाख २७ हजार ३४४, ग्रामीणचे १ लाख ४० हजार ३४७ व्यक्तींचा समावेश आहे. हे कोरोनामुक्तांचे प्रमाण ९८.०४ टक्के आहे. जिल्ह्याबाहेरील येथे उपचाराला आलेल्या रुग्णांचा मृत्यू वगळता येथे रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.५९ टक्के आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे १ हजार ६०८ रुग्ण आढळले. त्यात शासकीय रुग्णालयातील ५९९ रुग्ण खासगी रुग्णालयातील १ हजार ४९ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांतील १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ३८ मृत्यू शासकीय रुग्णालयांत तर ११६ मृत्यू खासगी रुग्णालयांत झाले. हे मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ९.५७ टक्के आहे. कोरोनाच्या तुलनेत म्युकरमायकोसिसच्या मृत्यूचे प्रमाण तब्बल सहा पट आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात म्युकरच्या १ हजार १९५ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया झाल्या. त्यातील ३७७ शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयांत तर ८१८ शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांतील आहेत. तर उपचारानंतर १ हजार १२७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. त्यात शासकीय रुग्णालयातील २९७, खासगी रुग्णालयातील ८३० रुग्णांचा समावेश आहे.

रुग्णस्थिती
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात शहरातील २९२, ग्रामीणच्या ४४ रुग्णांचा समावेश आहे. म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात ३२७ सक्रिय रुग्ण असून त्यातील सर्वाधिक १७८ रुग्ण शासकीय रुग्णालयांत तर १४९ रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

Web Title: Shocking the mortality rate of mucomycosis is six times higher than that of corona revealed from the report of the district surgeon nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2021 | 08:51 PM

Topics:  

  • Mucormycosis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.