लग्न जमण्यात अडचण येतेय? मग 'या' प्रसिद्ध शनिमंदिरांना एकदा भेट देऊन पहा
सध्या श्रावण महिना सुरु आहे. हिंदू धर्मात हा महिना सर्वात पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याला व्रत-वैकल्याचा महिना असेही म्हटले जाते. या महिन्यात श्रावणी सोमवार आणि शनिवार या दिवसाला खास महत्त्व असते. धार्मिक मान्यतेनुसार ज्याच्यावर साडेसाती, ढैय्या किंवा लग्न जमण्यात सारखी अडचण येत असेल तर भारतातील या शनि मंदिरांचे दर्शन घेतल्याने दु:ख दूर होतात, अशी भाविकांची धारणा आहे. या निमित्त आज आम्ही तुम्हाला भारतातील काही खास आणि प्रसिद्ध शनिमंदिरांविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.
धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेव हे हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात नामांकित देवता आहेत. यांना धर्म ग्रंथात न्याय देवता असे म्हटले आहे. शनिदेव शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि शनिवारचे स्वामी आहेत. त्याचा मोठा भाऊ यम हा मृत्यूचा देव म्हणूनही ओळखला जातो. मृत्यूंनंतर यम माणसाच्या कर्माचे फळ देतो, हे तर सर्वांचं माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? शनिदेव हे एखाद्या माणसाला वर्तमान जीवनातच त्याच्या कर्माचे फळ देण्यासाठी ओळखले जातात. श्रवणानिमित्त आज आम्ही तुम्हाला भारतातील लोकप्रिय शनिमंदिरांबद्दल विस्तारपूर्वक सांगत आहोत. या मंदिरामध्ये शनिदेवाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येत असतात.
हेदेखील वाचा – धार्मिक महत्त्व आणि अद्भुत सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भारताच्या ‘या’ 5 जैन मंदिरांना एकदा नक्की भेट द्या
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्यातील नेवासा तालुक्यात वसलेले हे मंदिर प्रसिद्ध शनिमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण या मंदिराला भिंती नाहीत तर चारही बाजूंनी हे मंदिर खुले आहे. इथे एका व्यासपीठावर पाच फूट उंचीची एक शिला आहे, ज्याची शनिदेवाच्या रूपात पूजा केली जाते. येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते.
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात स्थित श्री शनिचर मंदिर हे भारतातील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात एक पवित्र तलाव आहे. तसेच इथे भगवान शनिदेवाची प्राचीन काळ्या दगडाची मूर्ती आहे. मुरैना हे एकत्तरसो महादेव मंदिर, चौसठ योगिनी मंदिर आणि काकणमठ मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मंडपल्ली येथे मंडेश्वर स्वामी मंदिर वसलेले आहे. हे मंदिर राज्यातील सर्वात लोकप्रिय शनि मंदिर आहे. मंदिराच्या संकुलात शनीचे मंदिर आहे – संनेश्वर आणि हे छोटेसे मंदिर मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करतात.
तिरुनाल्लर शनिस्वरण मंदिर हे भगवान शनिला समर्पित असून हे मंदिर पाँडिचेरीच्या कराईकल जिल्ह्यात वसलेले आहे. भारतातील शनि ग्रहाच्या नवग्रह मंदिरांपैकी एक म्हणून या मंदिराची गणना केली जाते.