मेरठमध्ये शनिवारी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. (Meerut Kavad Yatra Accident) येथे भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावड यात्रेत साऊंड सिस्टमचा हाय व्होल्टेज विद्युत तारांना स्पर्श झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर, 20 हून अधिक झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये सख्ख्या भावांसह काका-पुतण्याचाही समावेश आहे.
[read_also content=”ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर बनणार बायोपिक, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका! https://www.navarashtra.com/latest-news/biopic-will-be-made-on-vetarna-actress-meena-kumari-kriti-sanon-wii-be-the-lead-role-nrps-432044.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, राली चौहान गावातील रहिवासी संजू आणि प्रदीप शनिवारी रात्री हरिद्वारहून आपल्या साथीदारांसह गावात पोहोचले. कावड यात्रेला पाहण्यासाठी गावाबाहेर मेरठ-फोर्ट मार्गावर गावकऱ्यांची गर्दी जमली होती. या दरम्यान साऊंड सिस्टीमची ट्रॅक्टर-ट्रॉलीचा आणि हाय टेन्शन लाईनला स्पर्श झाला. यावेळी संपूर्ण ट्रॉलीला विजेचा धक्का बसला आणि सर्व भक्त होरपळले. घटनास्थळी काही लोकांनी जखमींना ट्रॉलीतून वेगळे केले. 20 जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना गंगानगर येथील आयआयएमटी, आनंद हॉस्पिटल आणि मेरठमधील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण असून या घटनेच्या निषेधार्थ भक्तांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस-प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिवभक्तांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि काका-पुतण्यांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.