मुंबई : 1949 मधील ‘महल’ (film mahal) सिनेमातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं लतादीदींच्या (Latadidi) कारकिर्दीला वेगळं वळण देणारं ठरलं. या गाण्यासाठी लतादीदी एका कोप-यातून हे गाणं गात-गात माईकसमोर आल्या….अभिनेत्री हे गाणं दूरवरून गात-गात येतेय असा फिल त्या गाण्याला द्यायचा होता. त्यामुळे लतादीदी स्टुडिओच्या एका कोप-यातून हे गाणं गात- गात आल्या आणि आवाजातला योग्य परिणाम त्यांनी मोठ्या कल्पकतेने सादर केला. त्यामुळे लता दिदी फक्त एक उत्तम गायिकाच नव्हत्या. तर एक सृजनशील व्यक्तीमत्त्व होतं. अनेक अवघड गीतं त्यांनी लीलयापणे सादर केली.
अनिल बिस्वास,(ANIL BISWAS) शंकर जयकिशन, (Shankar jaikisan) नौशाद अली (naushad ali), एस डी बर्मन (s.D.Barman), सी. रामचंद्र, (c.ramchadra) हेमंत कुमार, (hemant Kumar) सलील चौधरी, (salil chaudhari) खय्याम, (khayyam) रवी, कल्याणजी-आनंदजी, (kalyanji anandji) वसंत देसाई (vasant desai) यासारख्या संगीतकारांसह अनेक हिट गाणी लतादिदींनी दिली. 1950 मध्ये लता दीदींच्या सुरांची बरसातच हिंदी सिनेसृष्टीमध्ये झाली.