श्रीकाकुलम : देशात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीसह, हैदराबादमध्येही गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमध्ये (Man Killed In Dog Attack) अनेकांना आपला जीव गमवाावा लागला आहे. आता अशीच एक घटना आंध्र प्रदेशमधुन समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील (Anddhra Pradesh) श्रीकाकुलम जिल्ह्यात एका दीड वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्लय गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.
[read_also content=”सोने खरदी करत आहात, तर आधी भाव घ्या जाणुन! सोन्याने ओलांडला 60,000 चा टप्पा https://www.navarashtra.com/india/if-you-are-buying-gold-get-the-price-first-gold-crossed-the-60000-mark-nrps-3-390461.html”]
आजतकच्या वृत्तानुसार, दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जी सिंगडम मंडलातील मेट्टावलासा गावात घडली. येथे, जी.सिगडम मंडल परिसरात असलेल्या मेत्तवलसा गावात 18 महिन्यांची मुलगी तिच्या घराच्या व्हरांड्यात खेळत होती. त्याचवेळी अचनानक 10-12 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर एकाच वेळी हल्ला केला.
[read_also content=”सोने खरदी करत आहात, तर आधी भाव घ्या जाणुन! सोन्याने ओलांडला 60,000 चा टप्पा https://www.navarashtra.com/india/if-you-are-buying-gold-get-the-price-first-gold-crossed-the-60000-mark-nrps-3-390461.html”]
मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत कुत्र्यांनी मुलीला गंभीर जखमी केले होते. नातेवाइकांनी कसेबसे मुलीला कुत्र्यांपासून वाचवले आणि गंभीर अवस्थेत तिला राजमच्या शासकीय रुग्णालयात नेले. तेथून प्राथमिक उपचारानंतर मुलीला श्रीकाकुलम येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. श्रीकाकुलम येथे उपचारादरम्यान निष्पापाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या आई-वडिलांची रडून अवस्था झाली आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, ही बाब शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वा. येथे 18 महिन्यांची मुलगी घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीची आई दुसऱ्याच्या घरी काम करून आपला उदरनिर्वाह करते.
घटनेनंतर, नातेवाईकांनी लगेच तिला रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे पाहून आईने रुग्णालयात धाव घेतली. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.