डिन्से प्लस हॉटस्टारवर नवीन मर्डर मिस्ट्री ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ घेऊन परतला आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadhha) पोलिसांच्या भूमिकेत आहेत. या वेब सीरीजमध्ये प्रतीक आणि ऋचासोबत आशुतोष राणाही एका खास भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेची कथा दोन आदिवासी मुलींच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात सापडलेल्या छत्तीसगडच्या गृहमंत्र्यांच्या मुलाच्या खून प्रकरणाची उकल करणारी आहे. या मालिकेचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले आहे. प्रेक्षकांना एक जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे. द ग्रेट इंडियन मर्डरशी संबंधित काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.
[read_also content=”‘पंजाबमध्ये कमकुवत मुख्यमंत्री व्हावा, अशी वरिष्ठांची इच्छा’, नवजोतसिंग सिंद्धूंचा हल्लाबोल https://www.navarashtra.com/latest-news/seniors-want-weak-chief-minister-in-punjab-says-navjot-singh-sindhu-nrps-232562.html”]
कादंबरीकार विकास स्वरूप यांची पहिली कादंबरीवर आधारीत स्लमडॉग मिलेनियर हा चित्रपट आला होता. आता त्यांच्या दुसऱ्या कादंबरी सिक्स सस्पेक्ट्सवर द ग्रेट इंडियन मर्डरवर ही वेब सिरीज आधारीत आहे. एक खुनाचे सहा खून संशयित आहे. राजकारण आणि भ्रष्टाचाराच्या वेढ्यातून खरा हत्यारा शोधण्याचं आव्हान लिलया पेलताना दाखवलं आहे.
[read_also content=”बॉलिवूडकडून चित्रपटांची मेजवानी; RRR ते ‘लाल सिंग चड्डा’ इथे पाहा रिलीज डेट https://www.navarashtra.com/latest-news/new-release-movies/checkout-bollywood-new-movies-release-dates-here-nrak-232569.html”]