राजकीय दबावाखाली पोलिस टार्गेट करत असल्याचा आरोप एआयएमआयएम पक्षाचे All India Majlis-e-Ittehadul Muslimeen party (AIMIM) नेते व औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील MP Imtiaz Jaleel यांनी केला आहे. एआयएमआयएमचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष खालीद शेख Khalid Sheikh यांच्यावर खंडणीसह बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भिवंडी शांतीनगरचे पोलिस निरीक्षक शितल राऊत यांचं नाव घेत पोलिस Bhiwandi Police खालीद शेख यांना टार्गेट करत असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील
“भिवंडीतील काही पोलिस अधिकारी कुणाच्यातरी इशाऱ्यावर काम करत आहेत. या प्रकरणात आम्हाला CID कडून योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही उच्च नाही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावू. आम्हाला न्याय हवा. त्यासाठी आम्ही भिवंडी पोलिस स्थानकासमोर धरणं आंदोलन करु. मी आत्ताच सांगतो या आंदोलनात फक्त आम्हीच नाहीतर पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी देखील उपस्थित असतील याची मी खात्री देतो.”
नेमकं प्रकरण काय?
एआयएमआयएमचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष खालीद शेख यांच्यावर खंडणीसह बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे सर्व गुन्हे खोटे असून भिवंडी शांतीनगरचे पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भिवंडीतील पोलिस अधिकारी कुणाच्यातरी इशाऱ्यावर काम आहेत असा आरोप जलील यांनी केला आहे.
खासदार जलील खालीद शेख यांच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा तपास CID करत असून या तपासात काय समोर येत हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.