
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. उन्हाच्या या उष्ण लाटांमुळे सर्वांनाच पावसाळ्याची आस लागून राहिली आहे. पावसाळ्याची खासियत म्हणजे या दिवसांतील थंडगार वातावरण आणि फिरण्यासाठीचे बहारदार स्पॉट्स. पावसाळ्यात अनेक ठिकाणे आणखीनच सुंदर दिसू लागतात. महाराष्ट्रात असे काही स्पॉट्स आहेत जिथे पर्यटक प्रत्येक पावसाळ्यात जाण्याचा प्लॅन करत असतात.
आज आम्ही तुम्हाला महाराष्टातील अशाच काही स्पॉट्स विषयीची माहिती सांगणार आहोत. हे स्पॉट्स पावसाळ्यात खूप सुंदर दिसतात. हे पावसाळी स्पॉट्स या दिवसांत इतके बहारदार दिसतात की इथले सौंदर्य फक्त डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते. तुम्हीही या पावसाळ्यात कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील या नयनरम्य आणि सौंदर्याने नटलेल्या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.
[read_also content=”महाराष्ट्रातील ‘या’ धबधब्यांच सौंदर्य तुम्हाला घायाळ करून टाकेल, एकदा तरी नक्की भेट द्या https://www.navarashtra.com/lifestyle/the-beauty-of-these-waterfalls-in-maharashtra-will-blow-your-mind-visit-at-least-once-537813.html”]
माळशेज घाट
पावसाळ्यात महाराष्ट्रातील सुंदर ठिकांणांपैकी माळशेज घाट एक आहे. समुद्रसपाटीपासून 7 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यातील लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. ट्रेकर्स प्रेमींसाठी तर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात इथे सर्वत्र हिरवळ असते आणि येथील पर्वत या दिवसांत ढगांनी झाकले जातात. पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. पश्चिम घाटातील पर्वत रांगेत माळशेज घाट वसलेले आहे. माळशेज घाटात तुम्ही माळशेज धबधबा, आजोबागड किल्ला, पिंपळगाव जोगा धरण आणि कोकण कडा या ठिकाणांना भेट देऊ शकता.
डहाणू
डहाणू महाराष्टातील पालघर जिल्ह्यातील एक तालुका आहे. सौंदर्याच्या बाबतीत याची कामालच वेगळी. हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून पावसाळा हा इथे जाण्याचा परफेक्ट सिझन आहे. इथे तुम्हाला छोटे छोटे डोंगर आणि गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. हे एक असे ठिकान आहे जिथे, दरवर्षी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्स आणि बायकर्स येत असतात. इथे तुम्ही डहाणू बीच, महालक्ष्मी मंदिर, बोर्डी बीच आणि डहाणू किल्ला यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
माथेरान
माथेरान चे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हे रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे ठिकाण सहलीसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या हे ठिकाण पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. येथील मनमोहक दृश्ये एकदा तरी पाहण्यासारखी आहेत. माथेरानमध्ये, तुम्ही शार्लोट लेक, मंकी पॉइंट, शिवाजी पायऱ्या, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट अशा येथील काही उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता.
पाचगणी
पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. सह्यद्रीच्या पाच पर्वतरांगांनी वेढलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींना आणि सहासप्रेमींना नेहमीच आकर्षित करते. ब्रिटिश राजवटीत उन्हाळी रिसॉर्ट म्हणून याचा वापर केला जात होता. पाचगणीमध्ये टेबल लँड, सिडनी पॉइंट, भिलार फॉल्स, पारसी पॉइंट आणि राजपुरी लेणी यांसारख्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.