घटना.
इ.स. पूर्व ३५६ : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
१८३१ : बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
१९४४ : २० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.
१९६० : सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
१९७६ : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.
१९८३ : अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
२००२ : जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.