#Tokyo Olympics: भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगाट उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

आज महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५३ किलो वजनी गटामध्ये विनेश फोगाटने पहिली लढत जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र उपांत्यपूर्व लढतीत विनेशला बेलारूसच्या वनेसा कालाडझिन्स्काया हिचे आव्हान परतवणे विनेशला शक्य झाले नाही. बेलारुसच्या कुस्तीपटूने विनेशला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले.
75c85610267c952bdda097413f434ed796bdcadd55babf256164847620efcc22
Published on: 
Updated on: 

टोकियो यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीमध्ये महिलांच्या गटामध्ये आज झालेल्या लढतीत भारताला अपयशाचा सामना करावा लागला. एकीकडे कांस्यपदकसाठीच्या रिपिचेज फेरीत भारताच्या अंशू मलिकला पराभव पत्करावा लागला. तर महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

आज महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५३ किलो वजनी गटामध्ये विनेश फोगाटने पहिली लढत जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र उपांत्यपूर्व लढतीत विनेशला बेलारूसच्या वनेसा कालाडझिन्स्काया हिचे आव्हान परतवणे विनेशला शक्य झाले नाही. बेलारुसच्या कुस्तीपटूने विनेशला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले. दरम्यान, वनेसा कालाडझिन्स्काया हिने घेतलेली आघाडी मोडून काढणे विनेशला अखेरपर्यंत शक्य झाले नाही. अखेर विनेशला या लढतीत ३-९ अशा गुणफरकाने पराभव पत्करावा लागला. आता वनेसा कालाडझिन्स्काया ही उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचल्यास विनेशला रेपिचेज फेरीतून पदक जिंकण्याची संधी असेल.