

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरवर भारताच्या महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने(Lovlina Borgohain) (६९ किलो) मध्ये कांस्य पदकाची( Bronze )कमाई केली आहे. ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताने हे पहिले पदक जिंकले आहे. लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती.
आणि निर्णय घेतला
मागील वर्षी लव्हलिनाला करोनाची लागण झाल्यानंतर तिला सरावासाठी यूरोप दौऱ्यावर जाता आलं नाही. त्यामुळेच लव्हलिनाने भारतामध्ये राहूनच सराव केला. म्हणूनच तिचा हा विजय अधिक महत्वाचा आहे. लव्हलिनाचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. कोणत्याही लहान शहरामधून किंवा गावातून आलेल्या खेळाडूंप्रमाणे तिलाही आर्थिक संकटांचा आणि समाजातून होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागला. लव्हलिनाचा जन्म आसाममधील गोलाघाट जिल्ह्यामध्ये २ ऑक्टोबर १९९७ साली झाला. लव्हलिनाचे वडील टिकेन हे एक छोटे व्यापारी होते. त्यांनी आपल्या मुलीची बॉक्सिंग सारख्या क्षेत्रात करियर करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी बराच संघर्ष केला. लव्हलिनाच्या दोन्ही बहिणी किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेत्या ठरल्या. मात्र लव्हलिनाने किक बॉक्सिंगऐवजी बॉक्सिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला.
एकदा लव्हलिनाचे वडील एका वृत्तपत्रामध्ये गुंडाळून मिठाई घरी घेऊन आले. ही मिठाई ज्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळली होती त्यावर बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांचा एक फोटो होता. हा फोटो पाहून लव्हलिनाने तिच्या वडीलांकडे या खेळाबद्दल चौकशी केली. लव्हलिनाच्या वडीलांनी तिला मोहम्मद अली यांच्या संघर्षमय प्रवसाची कथा सांगितली. त्यानंतर लव्हलिनाचं संपूर्ण आयुष्यच बदललं. यातच करिअर करण्याचा तिने निर्णय घेतला.
भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी २००८ मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर २०१२ लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. विशेष म्हणजे लवलीनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातलं आहे.
आज झालेल्या सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीने (Busenaz Surmeneli) लव्हलिनाला नमवले. अटीतटीच्या सामन्यात सुरमेनेलीने लवलीनाला ५-० ने नमवत पुढची फेरी गाठली.