Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’; तूर उत्पादनात येणार घट

यंदा सोयाबीन कपाशी संत्रा आदी पीके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. वर्षभराचे आर्थिक गणित सांभाळणाऱ्या संत्र्याने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीत आणले. आता बळीराजाची उरलीसुरली मदार तुरीच्या पीकावर होती.

  • By Nitish Gadge
Updated On: Dec 09, 2021 | 05:05 PM
विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’; तूर उत्पादनात येणार घट
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली, संकटाची मालिका शेतकऱ्यांचा पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादनामध्ये झालेली घट आणि लागवडसाठी लागलेला खर्च कसा फेडायचा, सवकाराचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे.

त्यातच आता तुरीनेही विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका राहिलेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीच आहे पण आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

खरिपातील शेवटचे पीक
तूर हे खरिपातील शेवटचे पीक आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा या पिकावर परिणाम झाला नव्हता पण सध्या हे पिक शेंगा च्या पक्व अवस्थेत आहे. यातच मररोगाचे प्रमाण वाढत असल्याने याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. हिंगोली जिल्ह्यात अंदाजे 80 हजार हेक्टर वर तूर पिकाचा पेरा आहे. जवळपास 70 टक्के जमीन क्षेत्रावरील तूर वाळून गेली आहे.

सोयाबीन-संत्र्यानेही अडचणीत आणले
यंदा सोयाबीन कपाशी संत्रा आदी पीके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. वर्षभराचे आर्थिक गणित सांभाळणाऱ्या संत्र्याने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीत आणले. आता बळीराजाची उरलीसुरली मदार तुरीच्या पीकावर होती. परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीनेही शेतकऱ्यांच्या ‘हातावर तुरी’ दिल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे तुरीवर दवाळ रोगाचे सावट आले आहे.

वातावरणातील झालेल्या बदलामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तुरी सध्या करपल्या आहेत. तीन दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे याचा जबर फटका अमरावती जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आधी सोयाबीन नंतर कपाशी आणि आता तूरीमुळे शेतकऱ्यांच्या समोरील संकटांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.

[read_also content=”पुण्याचे महापौर गोत्यात; अट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/mayor-of-pune-gotyat-order-to-file-an-offense-under-atrocities-nrng-210444.html”]
e-KYC पूर्ण करा मगच हप्ता

[blurb content=”पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तथापि या योजनेत सरकारने काही बदल केले असून ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना सरकारने ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे. “]

Web Title: Turi on the hands of farmers in vidarbha marathwada tur production will decline nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2021 | 05:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.