Uddhav Thackeray
Uddhav Thackeray On Dasara Melava : या वर्षीसुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्हीसुद्धा या दसरा मेळाव्याला या असे आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिले.
संस्कार आणू शकत नाही
खोक्यातून तुम्ही सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही असं सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भाजपवर टीका केली. नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तोदेखील नाही असंच म्हणेल असाही टोला ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे सेवेकऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पारंपरिक वेशात आलेल्या या सेवेकरींनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.
उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राज्यातल्या विविध भागातून हे सेवेकरी (Maharashtra Temple Aradhya Daivat Sevekari) उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. त्यामध्ये काही लोककलावंतही त्यांच्या पारंपरिक वेशात उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपने जर नंदी बैलाला विचारलं की पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की शंभर टक्के नंदी बैल नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही. तुम्ही सगळे जण एकत्र या, ससंस्कृती पुढे नेण्यासाठी आपण एक मेळावा लवकरच घेऊ.
आपली परंपरा यावर्षी सुद्धा कायम
शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील. यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्ही सुद्धा या दसरा मेळाव्याला या असं आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिलं.
Uddhav Thackeray On Shiv Sena Dasara Melava : लवकरच तुमचा मेळावा घेऊ. उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजचं वातावरण पाहिलं तर तुमचा आशीर्वाद मला महत्त्वाचा वाटतो. अलिकडे परंपरा नष्ट होत आहेत. तुम्ही संस्कार देणारी माणसे आहेत. राज्यातील मंत्र्यांचे रुसवे फुगवे सुरू आहेत, मंत्री नाराज आहेत. पण तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी मंत्री नाराज झालाय का? त्यामुळे सगळ्यांनी एक व्हा. दसरा मेळाव्यानंतर एक तारीख ठरवू आणि तुमचा मेळावा घेऊ.