देवळी (Deoli). कोरोनाच्या संक्रमणात ऑक्सिजनअभावी (coronary heart disease) अनेकांचे प्राण गेले. आता तिसऱ्या लाटेची शक्यता (The third wave) वर्तवली जात असून या प्लांटच्या माध्यमातून दरदिवशी 500 सिलेंडर प्राणवायूचे उत्पादन (produce 500 cylinders of oxygen) होणार आहे. देवळीसारख्या छोट्या औद्योगिक वसाहतीत संगमच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्राणवायू प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो लोकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली.
देवळी येथील औद्योगिक वसाहतीत संगम ओटूच्या वतीने मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उभारण्यात आलेल्या संगम ओटू या प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता आभासी पद्धतीने करण्यात आले. यावेळी गडकरी म्हणाले, जिल्ह्यात पहिल्यांदा सुसज्ज ऑक्सिजन प्लांटचे निर्माण करून आरोग्याच्या कामात योगदान व सामाजिक दायित्वांची भावना जोपसल्याबद्दल महालक्ष्मी स्टील उद्योगाचे अभिनंदन केले.
[read_also content=” ‘तौक्ते’ चक्रीवादळ; महावितरणच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/taukte-hurricane-energy-minister-dr-nitin-raut-instructs-msedcl-to-be-ready-nrat-130370.html”]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून महालक्ष्मी स्टील उद्योगाने देवळीत शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे. तसेच सध्याच्या स्टील प्लांटला विस्तारित करून तसेच सीएनजी सिलेंडरचे उत्पादन करून येथील युवकांच्या हाताला काम मिळवून द्यावे. लघुउद्योग मंत्रालयाच्या वतीने स्टीलवर आधारित काही उद्योग देवळीत उभारून येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी कारखाना प्रशासनाचे व्यवस्थापिकीय संचालक योगेश मानधनी तसेच तसेच व्यवस्थापक सुरतराम दाखेडा व श्याम मुंदडा यांची उपस्थिती होती.
कारखान्याचे व्यवस्थापिकीय संचालक मानधनी म्हणाले, ऑक्सिजनचा हा प्लांट अतिशय परीश्रमातून उभा राहिला. बेंगलोरच्या कंपनीचा हा प्लांट नायझेरियाला परदेशात जात असताना देवळी येथे आणून अवघ्या 21 दिवसांत उभा करण्यात आला. या प्लांटची एक वेगळी टेक्नॉलॉजी असून वातावरणातील हवा ओढून तसेंच त्याला वायूत परावर्तित करून 99.5 टक्के शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. 7 कोटी 60 लाखांच्या खर्चातून हा प्रकल्प उभा राहिला आहे.
संगमच्या माध्यमातून सुरुवातीला दररोज अडीचशे ते तीनशे ऑक्सिजन सिलेंडर तयार होणार असून ते निःशुल्क देण्यात येणार असल्याची माहिती योगेश मानधनी यांनी दिली. यावेळी आमदार रणजित कांबळे, उपजिल्हाधिकारी खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.