Unique show Happy and Pinaki See the Unprecedented Ghost that Helps Humans in The Ghost Brothers
मुंबई : रात्री झोपण्यापूर्वी सांगितल्या जाणा-या कथा आपल्या बालपणीच्या लक्षणीय भाग राहिल्या आहेत. आपण सर्वांनी त्या अद्भूत कथा ऐकल्या आहेत आणि त्यापैकी आपल्याला भूतांच्या कथा अधिक लक्षात राहिल्या आहेत, कारण त्यामध्ये रोमांच व कॉमेडीचे परिपूर्ण संयोजन आहे. या भयावह, पण कॉमेडी कथांना पुन्हा एकदा उजाळा देत निकलोडियन या आघाडीच्या लहान मुलांचे मनोरंजन करणाऱ्या चॅनेलने आज नवीन ॲनिमेटेड शो ‘पिनाकी ॲण्ड हॅप्पी: दि भूत बंधूस’च्या सादरीकरणाची घोषणा केली. हा शो ९ नोव्हेंबर २०२० पासून सकाळी ११.३० वाजता सोनिकवर पाहायला मिळेल.
लहान मुलांना धमाल नवीन विश्वामध्ये घेऊन जात हा शो भूतांच्या असामान्य कुटुंबाला सादर करतो. या शोमधील प्रमुख पात्र पिनाकी हा भूतांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक असल्याचे पाहायला मिळणार आहे. उच्चस्तरीय काल्पनिक शो प्रेक्षकांना पिनाकी व हॅप्पीच्या रहस्यमय साहसी कृत्यांसह हास्याच्या राइडवर घेऊन जाईल. तसेच शोमध्ये काही भूतबाझीसोबत कॉमेडी देखील पाहायला मिळेल. हे दोघेही वास्तविक विश्वामध्ये भूत विश्वाला सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. पिनाकीचा पार्टनर-इन-क्राइम हॅप्पी या १९ वर्षीय मजेदार भूतासोबत त्याची रोजची साहसी कृत्ये किंवा ‘भूतबाझी’ अद्वितीय मनोरंजन देतील. या शोचे दिग्दर्शन अंकुर चौहान यांनी केले आहे. शोच्या शीर्षक गाण्याचे बोल पुन्हा एकदा दिग्गज गुलजार साब यांनी लिहिले आहेत आणि सिमाब सेन हे संगीतकार आहेत.
[read_also content=”मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी डिसेंबर उजाडणार,प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल साशंकता https://www.navarashtra.com/latest-news/marathi-films-will-be-released-in-december-49996.html”]
‘भूत बंधूस’ हे मोटू पतलू, रूद्रा व शिवा अशा संस्मरणीय स्वदेशी पात्रांच्या दीर्घ यादीमधील नवीन पात्रांची भर आहे. या पात्रांसह निकलोडियन भारतभरातील लहान मुलांचे मनोरंजन करत आले आहे.
वास्तविक विश्वाचा भूत विश्वाशी मिलाप होतो तेव्हा होणारी कॉमेडी पाहा सोनिकवर दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.३० वाजता.