सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असत. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही थक्क करून जातात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली. इथे एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःला गोळी मारत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपला एक व्हिडिओ बनवला होता. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पम्मी असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव. तो पालिका कार्यालयात ईव्हीएम स्टोअरच्या सुरक्षेचे काम करत होता. स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या करण्यापूर्वी पम्मीने आपला तीन मिनिटांचा व्हिडिओ शूट केला आणि यात आपल्या आत्महत्त्येचे कारण स्पष्ट केले. पम्मी हा मूळचा औरंगाबादमधील बुलंदशहर येथील अहिर गावातील आहे.
हेदेखील वाचा – एक कॉल आणि तरुण मृत्यूच्या विळख्यात! कारने जोरदार धडक दिली, व्यक्ती हवेत उडाला अन् धक्कादायक घटनेचा Video Viral
आपल्या आत्महत्त्येचा व्हिडिओ शूट करून पोलीस कॉन्स्टेबलने यात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. त्याने यात सांगितले की, दोन वर्षांपासून त्याला एका महिलेकडून ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यामुळेच या गोष्टीला कंटाळून त्याने आपला जीव देण्याचा निर्णय घेतला. त्याने व्हिडिओमध्ये सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तो एका महिलेच्या संपर्कात आला होता. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण काही दिवसांनी त्या महिलेने तिच्या दोन साथीदारांच्या मदतीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, गेल्या दोन वर्षांपासून ती महिला पोलिस कॉन्स्टेबल पम्मीला ब्लॅकमेल करत होती. यादरम्यान महिलेने पम्मीवर पैसे देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी पम्मीने घाबरुन त्यांना सहा लाख रुपयेही दिले. मात्र, तरीही महिलेसह तिचे साथीदार पैशांची मागणी करत राहिले.
गाजियाबाद में एक कांस्टेबल ने आत्महत्या कर ली
यह वीडियो सिपाही द्वारा बनाया गया है, जो वायरल हो रहा है। pic.twitter.com/ISDAmCbsze— Priya singh (@priyarajputlive) July 16, 2024
एवढेच काय तर पुढे त्याने सांगितले की, त्याला दोन वर्षांपासून त्याला ब्लॅकमेल करणारी महिला ही त्याच्याच परिसरात राहणारी आहे आणि त्याच गावातील आणखी दोघांना घेऊन तिने पम्मीला अडकवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पम्मीने त्याच्या पत्नीचे दागिने विकून त्या लोकांना पैसे दिले होते, मात्र त्यांची मागणी संपली नाही तर आणखीनच वाढत गेली. शेवटी या गोष्टीला वैतागून पम्मीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
या व्हिडीओत स्पष्टपाने कॉन्स्टेबलच्या या आत्महत्येला ती महिला आणि तिचे साथीदार जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे . व्हिडीओ बनवल्यानंतर पम्मीने रात्री 8.30 वाजता सरकारी रायफलने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडून घेतली आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. व्हायरल व्हिडिओ @Priya singh नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.