

कोरोनाचे उगमस्थान म्हणून चीनकडे पाहिले जाते. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या ‘वुहान’ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, आणि अख्या जगाने धास्ती घेतली. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळात कोरोनाचा पहिला रुगण आढळला होता. त्यानंतर दिल्ली, पुणे, बंगळरु असे करत अख्या भारतात कोरोनाचे रुग्ण सापडत गेले, आणि २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्याती आली होती. कोरोनावर औषध, कोणती लस प्रभावी ठरेल यासाठी जगातील वैज्ञानिक रात्रदिवस संशोधन करु लागले होते. जगातील अनेक देशात कोरोनाच्या विषाणूवर औषध म्हणून लसीची निर्मित करण्यात आली.
भारतात तब्बल नऊ महिन्यांनतर म्हणजे १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोनावर पहिली लस देण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत देशात लसीकरण सुरु आहे. कोरोनामुळं भीतीच्या वातावरणाखाली जगणारे लोकांना या लसीमुळं हायसे वाटले. परंतु कोरोनाची महामारी आणि लसीकरणासारखे मोठे आव्हान असताना, अनेकांनी मात्र याचे राजकारण केल्याचे दिसून आले. परंतु देशाची लोकसंख्या पाहता देशातील लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे, लसीकरणामुळं आता आपण सर्व काही हळूहळू खुले करत असून, सकारात्मक पाऊल टाकत आहोत. आरोग्याची काळजी घेत, कोरोना लसीच्या बाबतीत मोठं ‘सीमोल्लंघन’ आपण करत आहोत. मागील ९-१० महिन्यात देशात लसीकरण कशा प्रकारे सुरु आहे? लस घेतल्याने कोरोना होत नाही का? आतापर्यंत देशात आणि राज्यात किती टक्के लसीकरण झाले आहे, याचा आपण मागोवा घेणार आहोत.
भारतात कोरोनाचा शिरकाव
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. कोरोनाच्या थैमानाने करोडो लोकांचे जीव गेले. जगातील सर्व क्षेत्राला फटका आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उपासमारीमुळं अनेकांचे जीव गेले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या ‘वुहान’ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, आणि अख्या जगाने धास्ती घेतली. कोरोनामुळं जगाची घबराट उडाली. ज्या कोरोनाची भारताला भीती होती, त्या कोरोनाने भारताले गाठलेच. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिल्ली, पुणे, बंगळरु असे करत-करत अख्या भारतात कोरोनाचे रुग्ण सापडत गेले, आणि २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्याती आली होती. कोरोनावर औषध, कोणती लस प्रभावी ठरेल यासाठी जगातील वैज्ञानिक रात्रदिवस संशोधन करु लागले होते. भारतात सुद्धा कोरोनाच्या विषाणूवर औषध म्हणून काय प्रभावी ठरेल याचा शोध, संशोधन वैज्ञानिक, आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टर करु लागले. आणि अखेर भारतात कोरोनावर प्रभावी औषध म्हणून पुण्यातील सिरम संस्थेकडून “कोव्हिशिल्ड” या पहिल्या लसीची निर्मिती करण्यात आली. आणि देशात जल्लोष करण्यात आला.
९ महिन्यानंतर देशात लसीकरणाला सुरुवात
प्रत्येक भारतीय ज्याची उत्कंठतेने वाट पाहतोय त्या कोरोना प्रतिबंधक “कोव्हिशिल्ड” लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात झाली. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही एतिहासिक घटना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली. २ जानेवारी २०२१ रोजी देशभरात कोरोना लशीची ड्राय रन झाली. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. ३ जानेवारी रोजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतात दोन कोरोनाविरोधी लशींना मंजुरी दिली. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोव्हिड-१९ विरोधी लशीला आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली. भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ही भारतात तयार झालेली पहिली कोरोनाविरोधी स्वदेशी लस आहे. 'कोव्हॅक्सीन' ला भारतात आपात्कालीन परवानगी मिळाल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
कॉँग्रेससोबतच देशातील एका मोठ्या गटाने ही लस प्रभावी आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'कोव्हॅक्सीन'ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्याचे निष्कर्ष येणं बाकी आहे. तरीही देशात या लशीच्या वापरची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सर्व अडचणीवर मात करत “देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली” त्यानंतर देशात सर्वात आधी कोणाला लस मिळणार? याची उत्सुकता होती. सर्वांत आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. "डॉक्टर, सरकारी, महापालिका कर्मचारी, फ्रंटलाइनवर कोव्हिडविरोधी लढ्यात उतरलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली गेली. तसेच ५० वर्षांवरील आणि इतर आजारांनी ग्रस्त लोकांना ही पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाविरूद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढते असे बर्याच संशोधनात दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सरकार सर्वच लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करत आहे.
लस घेतल्यानंतर नागरिकांना काही इतर लक्षणं जाणवू शकतात. पण याविषयी सर्वांना स्पष्ट माहिती न दिल्यास त्याचा या मोहिमेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात लस घेतल्यानंतर त्याचे इतर परिणाम आढळल्याचे २३ हजार प्रकरण समोर आली आहेत. त्यामध्ये बहुतांश प्रकरणं ही थकवा, अशक्तपणा, किंचित ताप तसंच पाय दुखणं वगैरे स्वरुपाची होती. त्याशिवाय अनेकांना विपरीत लक्षणं दिसून आली आहेत. तर लस घेऊनसुद्धा ४८८ लोकांचे मृत्यू गेल्याचे जून महिन्यापर्यंत आढळून आले होते. पण केंद्र सरकारने हे मृत्यू लसीकरणामुळे झाले नसल्याचं म्हटले होते. लस घेतल्यानंतरही मृत्यू होण्याचं प्रमाण नगण्य आहे. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त धोका कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आहे, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अजूनही लहान मुलांचं लसीकरण ही समस्या आहे. या पातळीवरही लहान मुलांचं लसीकरणबाबत निर्णय होण्याची गरज आहे, तातडीची गरज आहे. कारण तिसरी लाटेची सुद्धा शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच लसीकरण केले तरी तिसरा डोस गरजेचा ठरण्याची शक्यता सुद्धा आहे असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
जितक्या जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचेल. तितक्या जास्त लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल. कोरोनाविरोधी लशीचं संशोधन आणि चाचणीचा कालावधी ९-१० महिन्यांचा आहे. त्यामुळे याच्या सुरक्षिततेवर कोणतचं प्रश्नचिन्ह नाही. लशीचा बराच कालावधी उलटून गेल्यानंतर काय परिणाम होतो. हे तपासणं अजूनही बाकी आहे. लशीचा परिणाम काही वर्षांनंतर कळू लागतो. तज्ज्ञांच्या म्हणणानुसार 'सर्व लशींची सुरक्षितता चांगली आहे. लस घेतल्यानंतर थोडा ताप, लस घेतलेल्या जागी सूज येणं किंवा डोकेदुखी अशी लक्षणं दिसून येतात. कोणतीही लस ५० टक्के प्रभावी असेल तर, ती लस फायदेशीर असं समजलं जातं. तसेच 'लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता फार कमी आहे'. असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळं भारताचे नाव जगातजगात भारताने विक्रमी लसीकरण केले आहे, तसेच अधिक गतीने कोरोनावर लसीची निर्मिती करण्यात सुद्धा भारत अग्रेसर आहे. स्वत:च्या देशाबरोबर दुसऱ्या देशाला सुद्धा भारताने लसी निर्यात केली आहे, त्यामुळं भारताचे नाव जगात रोशन झाले आहे. पुण्यातील ‘सिरम संस्थेने’ निर्मित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ हि लस अनेक देशांना विनामूल्य निर्यात केली आहे. तसेच भारताच्या सिरम या संस्थेच्या स्वस्त लसींमुळे आत्ता जगात भारताचं नाव मोठं झालं आहे. अविकसित देशांसाठी लस पुरविणारा देश अशी आपली आता जगात ओळख झाली आहे, आणि हेच खरे आपण ‘सीमोल्लंघन’ केले आहे. तसेच कमीतकमी दरात, प्रभावी लसनिर्मिती करणारा देश अशी ओळख भारताची निर्माण झालीये. जी आत्मनिर्भर भारतासाठी गरजेची आणि महत्त्वाची आहे. यामुळं भारताला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आहे.