Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार केव्हा घेणार दखल? कुणाल कामरा-ओला वादात मंत्री नितीन गडकरींची एंट्री!

कॉमेडियन कुणाल कामराने आज सोमवारी (ता.२८) पुन्हा एकदा ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 28, 2024 | 05:00 PM
सरकार केव्हा घेणार दखल? कुणाल कामरा-ओला वादात मंत्री नितीन गडकरींची एंट्री!

सरकार केव्हा घेणार दखल? कुणाल कामरा-ओला वादात मंत्री नितीन गडकरींची एंट्री!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक व सीईओ भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यातील समाजमाध्यमांवरील वाद चांगलाच टोकाला गेला आहे. अशातच आता कॉमेडियन कुणाल कामराने आज सोमवारी (ता.२८) पुन्हा एकदा ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

काय म्हटलंय ग्राहकाने आपल्या पोस्टमध्ये

आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये कामरा यांनी सांगितले आहे की, ओलाच्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु कंपनीला याचा काहीही फटका बसत नाहीये. याशिवाय कंपनीला ग्राहकांच्या समस्यांबाबत काहीही देणे-घेणे देखील नाही. त्यामुळेच कंपनीक ग्राहकांचा आवाज ऐकला जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ओला स्कूटरमधील बिघाडांबाबत सरकारी यंत्रणा यात हस्तक्षेप करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – ब्रँड इम्पीरियल व्हिस्कीचा ब्रँड विकला जाणार, खरेदीसाठी दोन कंपन्यांची चढाओढ; वाचा…सविस्तर!

 

Minister @nitin_gadkari please look at the plight of indian customers,
their voices aren’t heard.
They can’t get to work.
They are taking bad loans to solve an issue that is primarily Ola’s responsibility…
When will government agencies intervene? https://t.co/nJYapedavI

— Kunal Kamra (@kunalkamra88) October 28, 2024

सोलापूर येथील रंगराज नगर या एका युजरच्या तक्रारीवरून कामरा यांनी समाजमाध्यमावर ही पोस्ट केली आहे. या तक्रारीत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ओलाच्या अनेक स्कूटर दाखवल्या आहेत. ज्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. मात्र, त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. या ठिकाणी पात्र अभियंते किंवा तंत्रज्ञ नसल्यामुळे वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे त्यात गुंतवले असल्याने असा निष्काळजीपणा अस्वीकार्य असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि ओलाचे भाविश अग्रवाल यांनाही टॅग करण्यात आले आहे.

काय म्हटलंय युझरने आपल्या तक्ररीत

अन्य एका एक्स युजरनेही या पोस्टचे समर्थन करत म्हटले आहे की, ‘मी सोलापूरचा आहे आणि मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे. ग्राहकांना ज्या पद्धतीने वागवले जाते ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. विशेषतः जेव्हा त्यांनी ओला इलेक्ट्रिकसाठी संपूर्ण रक्कम भरली आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने सांगितले की, अलीकडील नियामक फाइलिंगनुसार, त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (सीसीपीए) प्राप्त झालेल्या 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण केले आहे.

हे देखील वाचा – 21 कोटी पगार, बोनस वेगळा… कोण आहे ही महिला जिने एचएसबीसी बॅंकेचा 160 वर्षांचा इतिहास बदलला

ग्राहकांना येणाऱ्या अडचणींबाबत कंपनीचे म्हणणे

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने म्हटले आहे की, ‘सीसीपीएकडून आम्हाला प्राप्त झालेल्या 10,644 तक्रारींपैकी 99.1 टक्के तक्रारींचे निराकरण ओला इलेक्ट्रिकच्या मजबूत निवारण यंत्रणेच्या अनुषंगाने ग्राहकांच्या पूर्ण समाधानासाठी करण्यात आले आहे.’ नोटीसला उत्तर देण्यासाठी सीसीपीएने कंपनीला १५ दिवसांची मुदत दिली होती. अलीकडेच भाविश अग्रवाल आणि कुणाल कामरा यांच्यात X वर जाहीर वाद झाला. ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना येणाऱ्या समस्यांबाबत कामरा यांनी चिंता व्यक्त केली होती.

Web Title: When will the government take notice minister nitin gadkari entry in the kunal kamra ola debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 05:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.