ब्रँड इम्पीरियल व्हिस्कीचा ब्रँड विकला जाणार, खरेदीसाठी दोन कंपन्यांची चढाओढ; वाचा...सविस्तर!
भारतातील आघाडीचा व्हिस्की ब्रँड इम्पीरियल ब्लू विकला जाणार आहे. अशातच आता ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत दोन मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी लंडन स्थित भारतीय उद्योगपती रवी एस देओल यांची कंपनी इनब्रू बेव्हरेजेस आणि दुसरी अमेरिकन कंपनी टीपीजी कॅपिटल यांचा समावेश आहे. रवी एस देओल यांनी 1990 च्या दशकात भारतात कॉफी चेन बरिस्ता सुरू केली. तर टीपीजी कॅपिटल ही अमेरिकन खाजगी इक्विटी फर्म आहे.
इंपीरियल ब्लू हा भारतातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड आहे. मात्र, आता त्याची मालकी फ्रेंच कंपनी पर्नोड रिकॉर्ड इंडिया आणि ब्रिटिश कंपनी डियाजिओ यांच्याकडे आहे. पर्नोड रिकॉर्ड इंडियाकडून हा ब्रँड खरेदी करण्यासाठी इनब्रू बेव्हरेजेस हे मुख्य स्पर्धक आहेत.
हे देखील वाचा – स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!
अनेक कंपन्यांकडून इनब्रू बेव्हरेजेसची खरेदी
आघाडीच्या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुूसार, इनब्रू बेव्हरेजेस गेल्या चार वर्षांपासून मद्य कंपन्या खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. तिने डियाजिओ आणि मोल्सन कूर्सच्या बिअर पोर्टफोलिओकडून 30 प्रमुख मद्य ब्रँड्स विकत घेतले आहेत.
दुसरीकडे, इनब्रू बेव्हरेजेसप्रमाणे टीपीजी देखील व्हिस्की ब्रँड खरेदी करण्यात मागे नाही. त्याने गेल्या काही वर्षांत म्यानमार, तुर्किये आणि चीनमध्ये अनेक मद्य कंपन्यांची खरेदी आणि विक्री केली आहे. आता या दोन्ही कंपन्या भारतीय ब्रँड आयबी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. इनब्रू बेव्हरेजेसने गेल्या आठवड्यात बोली सादर केली. टीपीजी कॅपिटलनेही आयबी विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयबीसाठी अंतिम बोली लावली जाईल.
कंपनीचे मूल्यांकन काय आहे?
उद्योग तज्ञांच्या मते, आयबी कंपनीचे मूल्य 600-700 दशलक्ष डॉलर (8300 कोटी पर्यंत) आहे. ही रक्कम जास्त असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. या कारणास्तव जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी या कंपनीवर बोली लावण्यापासून माघार घेतली. तर वाढत्या इनपुट किमतींमुळे कंपनीचे मार्जिन कमी झाले आहे. या कारणास्तव अनेक कंपन्यांनी स्वतःला त्यापासून दूर केले आहे. बहुतेकांनी ब्रँडचे मूल्य 5500-6500 कोटी रुपये ठेवले आहे.
पेर्नोडचा मोठा भाग
भारतातील व्हिस्की मार्केटच्या सुमारे एक चतुर्थांश भाग पेर्नोड नियंत्रित करते. यानंतर डियाजिओचा 20 टक्के हिस्सा आहे. पेर्नोड त्याच्या विक्रीमध्ये सर्वाधिक कमाई ब्लेंडर्स प्राईड, रॉयल स्टॅग आणि इम्पीरियल ब्लू यांसारख्या ब्रँड्समधून करते. कंपनीकडे भारतातील निम्मी प्रीमियम व्हिस्की मार्केट आणि 42 टक्के इंपोर्टेड स्पिरिट मार्केट आहे.