
डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?
हे अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी इ.स. २००८ मध्ये जागतिक मंदीच्या लाटेतून सुटका करून घेण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना सल्ला मागितला होता. ऑक्सफोर्ड विद्यापीठात मनमोहनसिंगनी अर्थशास्त्र हा विषय शिकविलेला आहे. ते जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांची प्रतिमा आज्ञाधारक नोकरशहा अशी बनली होती. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त होते. ते १० वर्षे पंतप्रधान होते, परंतु या कालावधीमध्ये त्यांनी कधीच स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाही. त्यावेळी त्यांच्यावर असा आरोप करण्यात येत होता की, पंतप्रधान मनमोहनसिंगांवर सोनिया गांधी यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. ते एक मजबूर पंतप्रधान आहेत.
१० जनपथने घेतलेले निर्णय राबविणे, हेच त्यांचे काम आहेत. प्रणव मुखर्जी यांची ज्येष्ठता डावळून मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती, कारण ते सोनिया गांधी यांच्याप्रति एकनिष्ठ होते. सोनियांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. एकदा तर मनमोहनसिंगानी काढलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून फेकला होता. याला प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता ते पदावर कायम राहिले. इतकी वर्षे शांत असलेले मनमोहनसिंग आता मात्र पंतप्रधान मोदींनी इ.स. २०१६ मध्ये लागू केलेली नोटबंदी चुकीची होती. या नोटबंदीमुळे कित्येकांचे रोजगार गेळे. अनेक बेरोजगार झाळे, अशी टीका करीत आहेत. ज्यावेळी नोटबंदी लागू करण्यात आली त्यावेळीच मनमोहनसिंग नोटबंदी चुकीचे आहे, असे सांगू शकत होते, परंतु त्यावेळी ते काहीही बोलले नाही.
नोटबंदीमुळे काळ्या धनावर अंकुश लावता येईल, यामुळे दहशतवादी कारवायांवर लगाम लावता येईल, असे सांगितल्या जात होते, परंतु असे काहीही घडले नाही, असे मनमोहनसिंग म्हणाले. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद ठरवून २००० ची नवीन नोट चळनात आणण्यात आली, त्यामुळे कोणता फायदा झाला? नोटबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योग बंद झाले. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला अशी टीका मनमोहनसिंग करीत आहे. परंतु हे सांगण्यासाठी मनमोहनसिंगाना ४ वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित होतो.