
gurmeet ram rahim
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूकीच्या (Punjab Assembly Election 2022) आधी फर्लोवर बाहेर आलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला हरियाणा सरकारने Z+ सुरक्षा (Z Plus Security To Dera Sacha Chif Gurmeet Ram Rahim) दिली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांपासून (Threat From Khalistani Terrorists) धोका असल्यामुळे हरियाणा सरकारने ही सुरक्षा प्रदान केली आहे.
[read_also content=”बार्शीतील मंजूर रेशन दुकाने अनियमित ; आ. राऊत यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/solapur/sanctioned-ration-shops-in-barshi-are-irregular-b-rauts-complaint-to-the-district-collector-nrab-243184.html”]
हरियाणाच्या भाजप सरकारने अशी सुरक्षा व्यवस्था देण्याचा आधार एडीजीपी रिपोर्ट असल्याचे म्हटले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, खलिस्तानी समर्थक डेराच्या प्रमुखाचे नुकसान करु शकतात. त्यामुळे त्याला सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. आरोग्याच्या कारणांमुळेही अनेकदा डेरा प्रमुख जेलच्या बाहेर आला आहे. तो आत्तापर्यंत रोहतक जिल्ह्यामधील सुनरिया जेलमध्ये होता.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या २१ दिवस आधी फर्लोवर गुरमीत राम रहीम बाहेर आला आहे. निवडणुकीच्या आधी फर्लोच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या मुद्द्यावरून हरियाणा सरकारला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गुरमीत राम रहीम सिरसा स्थित त्याच्या आश्रमातील दोन महिला अनुयायांवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्याला पंचकुलाच्या एका विशेष सीबीआय कोर्टाने ऑगस्ट २०१७ मध्ये या प्रकरणात दोषी ठरवले होते.