दही फेशिअल कसे करावे?
सण समारंभ म्हंटल की सगळ्यात आधी महिला पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये जाणून क्लीनअप करणे, फेशिअल करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. फेशिअल केल्यामुळे त्वचा चमकदार आणि उजळलेली दिसते. त्यामुळे काही महिला महिन्यातून एकदा फेशिअल करून घेतात. पण अनेकदा फेशिअल करून आल्यानंतर सुद्धा काहींच्या त्वचेवर चमक दिसत नाही. अशावेळी महिला त्वचा आणखीन चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम आणि इतर प्रॉडक्ट लावतात. पण यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर दिसते. त्यामुळे त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला १ वाटी दही वापरून त्वचेवर चमक आणण्यासाठी कशा पद्धतीने दही फेशिअल तयार करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
दही फेशिअल कसे करावे?
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी आणि शरीरासाठी अनेक लोक नियमित दह्याचे सेवन करतात. दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच दह्यामध्ये फॅटी अॅसिड, प्रोटीन, विटामिन आणि खनिजे इत्यादी घटक आढळून येतात. तसेच दह्याचे सेवन केल्यामुळे आणि दही मास्क त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. चेहऱ्यावरील मृत पेशी निघून गेल्यानंतर त्वचे उजळदार आणि सुंदर दिसू लागते.
हे देखील वाचा: सतत चष्मा लावून नाकावर काळे डाग आले आहेत? डाग घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा
हे देखील वाचा: तुम्हालाही डोळ्यांच्या पापण्या जाड करायच्या आहेत का? जाणून घ्या टिप्स