फोटो सौजन्य - Social Media
पावसाळ्यात होणारे निसर्गातील बदल, वाढणारी हिरवळ, थंडगार वातावरण सगळ्यांचेच मन मोहून घेतात. लहानपणी तर पावसाळा प्रत्येकाचाच आवडता ऋतू असतो. पण जेव्हा आपण दररोज घराबाहेर पडायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. रोज ऑफिसमध्ये पोहचण्यात होणारा उशीर, प्रवासात होणार त्रास, ओले होणारे कपडे या सगळयांना कारणीभूत आपला लहानपणीच आवडता ऋतू पावसाळा असतो. पावसाळयात सगळ्यात जास्त सहन जे करतात ती म्हणजे आपली बूट! कधी कधी जास्त ओली झाल्याने त्यांना अखेरचा निरोपही द्यावा लागतो. पण आता ती वेळ मुळीच येणार नाही. पावसाळा तुमच्या बुटांना ओला नक्की करेल पण खराब करू शकणार नाही. कारण या लेखात तुम्हाला अशा टिप्स अँड ट्रिक्सबद्दल माहिती पडणार आहे, ज्याने तुम्ही तुमच्या ओल्या चिंब बुटांना मिनिटांत सुकवू शकता. तर लेख पूर्ण नक्की वाचा.
पावसात बाहेरून घरी आल्यावर आपल्या भिजलेल्या बुटांना मिनिटांत सुकवण्यासाठी कागदाचे गोळे नक्कीच कामी येईल. बुटांचे सोल ओले होऊन जर सारखे निघत असतील तर त्यांना बाहेर काढून सुकण्यासाठी ठेवा. यानंतर कागदाचे गोळे घ्या आणि ते बुटांमध्ये भरून ठेवा. तसेच संपूर्ण बुटांच्या चारी बाजूंनी कागदाचा लगदा लावून ठेवा. ही ट्रिक आजमावल्याने बुटांमध्ये जमा झालेले सगळे पाणी कागद सोखून घेतील. तसेच बूट लवकर सुकतील. त्याचबरोबर घरी हेअर ड्रायर असेल तर आणखीन उत्तम गोष्ट आहे. हेअर ड्रायरच्या वापराने काम आणखीन सोपे होईल. ओल्या बुटांना सुकवण्यासाठी हेअर ड्रायरची स्पीड तेज आणि गरम ठेवा. बुटांना आतल्या बाजूनी तसेच वरील बाजूने गरम हवा द्या. बुटे लवकर सुकतील आणि ओलाव्यामुळे बुटे खराब होण्याची शक्यताही कमी होईल.
पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी वॉशिंग मशीन बुटांमधील पाणी काढण्यातही अग्रेसर आहे. फक्त ही पद्धत वापरताना बुटे स्वच्छ असली पाहिजेत. या पद्धतीबरोबरच कोणताही पदार्थ सुकवण्याची प्रत्येक भारतीयांची युनिवर्सल टेक्निक टेबल फॅनचा वापरही उत्तम पर्याय ठरू शकतो.