Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉर्मल डिलिव्हरीनंतर टाके पडलेल्या नाजूक भागावरील त्वचेची अशी घ्या काळजी

After Delivery Care: बाळाला जन्म देताना सध्या नॉर्मल डिलिव्हरी फारच कमी प्रमाणात ऐकू येते. सिझेरियन झाल्याचेच ऐकू येते. पण नॉर्मल डिलिव्हरीने बाळाला जन्म देणं हे प्रत्येक महिलेच्या आरोग्यासाठी योग्य ठरते. मात्र नॉर्मल डिलिव्हरीमध्ये टाके असतली तर डिलीव्हरीनंतर कशी काळजी घ्यावी जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 12, 2024 | 09:41 AM
Normal Delivery Care

Normal Delivery Care

Follow Us
Close
Follow Us:

योनी आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतिपश्चात ‘पेरिनल वेदना’ म्हणतात. सामान्य प्रसूतीदरम्यान, बहुतेक स्त्रियांना पेरिनियमच्या भागावर दाब आणि स्ट्रेचिंग असते. जेव्हा बाळाचे डोके योनिमार्गातून बाहेर येते तेव्हा डॉक्टर पेरिनियम मध्ये एक लहान चीर देऊ  बाळाचे डोके बाहेर काढले जाते. नंतर या चीर पाडलेल्या जागेवर टाके टाकले जातात, पण बरे होईपर्यंत या भागात दुखत असते.

पेरिनिअल टिअर( व्हजायनल टिअर) त्यांच्या आकार आणि जखमेवर आधारीत असतो आणि त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. डॉ.  पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती आपल्या वाचकांसाठी दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

[read_also content=”प्रिमॅच्युअर डिलिव्हरी टाळता येते का? https://www.navarashtra.com/lifestyle/causes-symptoms-risk-factors-of-preterm-birth-why-is-increasing-536661.html”]

कोणत्या आहेत 4 श्रेणी? 

  • प्रथम श्रेणी: त्वचेचे हे फाटणे इतके किरकोळ असू शकते की त्यावर कोणतेही उपचार न करता ते स्वतः बरे होते. ह्यामध्ये पेरिनियमचे फाटणे वरवरचे असते आणि फक्त योनिमार्गाच्या बाहेरील थरांचा समावेश असतो. अशावेळी टाके घालावे लागत नाहीत आणि ते लवकर बरे होतात
  • द्वितीय श्रेणी: त्वचेचे हे फाटणे खोलवर जाते. ह्यासाठी त्वचेच्या थरांवर टाके घालणे आवश्यक आहे. ते साधारणतः काही आठवड्यांच्या कालावधीत बरे होतात
  • तृतीय श्रेणी: त्वचेचे फाटणे अधिक तीव्र असते आणि गुदद्वाराजवळील ऊती आणि स्नायूंच्या सखोल गुदद्वाराजवळील स्नायू (गुद्द्वार भोवतीच्या स्नायू) पर्यंत पसरते. त्यांना अनिवार्यपणे टाके आवश्यक आहेत आणि काही महिन्यांपर्यंत वेदना होऊ शकते. ह्या टाक्यांमुळे आपल्याला गुद्द्वार असंयमतेची जोखीम निर्माण होऊ शकते (मल नकळत पार करणे)
  • चतुर्थ श्रेणी: ह्या श्रेणीत त्वचेचे फाटणे गंभीर स्वरूपाचे असते जे गुद्द्वार आणि खाली असलेल्या ऊतींच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये जाऊन गुदाशय पर्यंत जाते. ही फाटलेली त्वचा शिवण्यासाठी तुम्हाला लहान शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते

चीर बरी होण्यासाठी कालावधी 

पेरिनिअल टीअर बरे होण्याचा कालावधी हा त्याच्या तीव्रतेनुसार बदलतो, अधिक खोलवर झालेली चीर बरी होण्यासाठी दीर्घ कालावधीची आवश्यकता भासते. हे छेद बरे होण्यासाठी किमान 2 ते 3 महिने लागू शकतात. या नाजूक भागाचे संरक्षण करण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हजायनल टिअर्सचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. 

[read_also content=”घरच्या घरी मिळवा गुड न्यूज, मिठानेही करता येते टेस्ट https://www.navarashtra.com/latest-news/health/pregnancy-tests-can-also-be-done-with-salt-such-is-the-method-nrng-142965.html”]

घरच्या घरी कशी काळजी घ्याल?

  • हॉट कॉम्प्रेसची थेरेपी: हे लवकर बरे होण्यास मदत करेल. प्रसूतीदरम्यान पेरिनियमला हॉट कॉम्प्रेस थेरेपी तेथील मऊ ऊतींना आराम देतात
  • चांगली वैयक्तिक स्वच्छता राखा: योनीमार्ग कोमट पाण्याने धुण्याची खात्री करा आणि तेथे केमिकलयुक्त उत्पादने वापरणे टाळा
  • कोल्ड कॉम्प्रेससाठी थेरेपी: स्वच्छ पाणी किंवा थंड पॅक वापरल्याने सूज आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल
  • योग्य कपडे परिधान करा: सुती कपड्यांचा वापर करा.जीन्ससारखे घट्ट कपडे घालणे टाळा, कारण ते योनीमार्गावरील त्वचेवर आणखी ताण वाढवू शकतात आणि बरे होण्यास विलंब होऊ शकतो
  • अतिव्यायाम टाळा: तुमच्या नाजूक भागावर ताण येईल असा व्यायाम करणे. या भागावर ताण आल्यास वेदना वाढू शकतात
  • बसताना सतर्क राहा: बसताना मऊ आणि आरामदायी उशी वापरा. जर तुम्ही कोणतीही क्रिम वापरत असाल तर तज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या
  • सिट्झ बाथ उपयुक्त ठरू शकते: मिठाच्या पाण्याच्या आंघोळीने लवकर बरे होण्यास मदत होते. मीठ खुल्या जखमेत तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट करते, ते योनीमार्ग जलद कोरडे करते आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देते. परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा. नाजूक भागावरी त्वचा जास्त घासली जाणार नाही याची खात्री करा
  • स्टूल सॉफ्टनर वापरायला विसरु नका: खोलवर असलेल्या छेदामुळे मलविसर्जनास अडथळे निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला मल विसर्जनादरम्यान ताण येत असेल तर डॉक्टरांनी सुचवलेले औषधोपचार करणे योग्य राहिल.

व्हजायनल टिअर ही महिलांकरिता चिंतेची बाब ठरु शकते. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After a normal delivery how to take care of the skin on the stitched delicate area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 09:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.