लहान वयात सर्वच मुले काहींना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन गोष्टी शिकताना काही वेळेस मुलं घाबरतात. ही एका नैसर्गिक प्रक्रिया आहे. नवीन गोष्टी शिकत असताना अनेकदा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्या नवीन वातावरणापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही मुलांसाठी चिंतेची बाब आहे. घरातील वातावरण बिघडल्यानंतर त्याचा परिणाम कळत नकळत मुलांवर होतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि हसत खेळत असलं पाहिजे.लहान वयात मुलं नवीन गोष्टी शिकण्यास घाबरत असतील तर ही चिंतेची बाब आहे. यामुळे तुमची मुलं घाबरट आणि डरपोक होऊ शकतात. आज आम्ही तुम्हला घरातील मुले कोणत्या गोष्टीमुळे घाबरट होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पालकांमधील चिंता:
ज्यावेळी पालक स्वता चिंतेत असतात त्या घरातील मुलं कधीच आनंदी आणि धैर्यवान बनवू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यात आधी पालकांनी स्वतःत पाळ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पालकांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. पालकांमध्ये चिंता वाढल्यानंतर मुलांमध्ये सुद्धा चिंता दिसून येते. त्यामुळे घरातील पालकांनी आनंदी असे फार गरजेचे आहे.
पालकांशी संपर्क तुटल्यानंतर:
आईवडिलांसोबत मुलांचा संपर्क तुटल्यानंतर मुले मानसिक दृष्ट्या तणावात जातात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आपल्या मुलांचे विचार पालकांनी इतर कोणालाही सांगू नये. यामुळे बाहेरील लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. या कारणामुळे तुमची मुले घाबरट किंवा डरपोक होऊ शकतात.
[read_also content=”चमकदार आणि मजबूत केसांसाठी वापरून पाहा बीटरूट कढीपत्ता हेअर मास्क https://www.navarashtra.com/lifestyle/for-strong-hair-growth-try-curry-leaf-beetroot-hair-mask-544752.html”]
वाईट अनुभव:
नवीन गोष्टी शिकत असताना मुलांना एखादा वाईट अनुभव आल्यानंतर मुले मानसिक दृष्ट्या काहीसे घाबरतात. त्यांच्या वयोमानानुसार त्याने आलेले अनुभव हे खूपच मोठे असतात. त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबदल भीती निर्माण होते.