अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलै रोजी मुंबईत लग्न होणार आहे. मात्र त्याआधी काही दिवसांपूर्वीच इटलीमध्ये त्यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा रंगला होता. याचे जास्त फोटो समोर आले नाहीत. मात्र आता नीता अंबानी, ईशा अंबानी आणि राधिका मर्चंटसह अनंत अंबानीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये राधिका, ईशा आणि नीता अंबानी यांचे सौंदर्य पाहून नक्कीच सामान्य माणसाचे डोळे दिपतील. त्यांचा पेहराव, राहणीमानाची पद्धत आणि फॅशन नक्की कशी होती याची एक झलक खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य – अंबानी अपडेट इन्स्टाग्राम)
नणंद – भावजयीचा आनंद
राधिकाने आपल्या एका सोहळ्यामध्ये ब्लू अँड सिल्व्हर गाऊन घातला होता. यामध्ये राधिकाचे सौंदर्य खुलून आले होते. तर तिच्यासह तिची नणंद ईशादेखील दिसून येत आहे. दोघीही मजेने आपल्या सोहळ्यातील क्षणांचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
नीता अंबानीचा गोल्डन लुक
नीता अंबानी यांनी स्टायलिश लुक करत व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन निवडले होते. व्हाईट वेस्टर्न कपड्यांसह त्यांनी घातलेले गोल्डन कानातले, गळ्याभोवती लपेटलेला गोल्डन क्लासी नेकलेस लक्ष वेधून घेतोय. तर कपड्याला एका बाजूने गोल्डन चैन लटकविण्यात आली आहे. नीता अंबानींच्या हास्याने यावर चारचाँद लावले आहेत.
राजकुमारी ईशा
ईशा अंबानी नेहमीच एखाद्या नाजूक राजकुमारीसारखी दिसते आणि यावेळीदेखील तिने तसाच पेहराव केला होता. फ्लोरल वर्कचा बॅकलेस गाऊन आणि खाली लाल रंगाचा पायघोळ असणारा हा ड्रेस पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे. त्यावर ईशाने हाफबन हेअरस्टाईल केली असून परफेक्ट मॅट असा पार्टी मेकअप लुक केलाय.
ब्लॅक अँड व्हाईट लुक
४ दिवस रंगलेल्या या सोहळ्यापैकी एका लुकमध्ये अनंत आणि राधिकाने ब्लॅक अँड व्हाईट लुक केला असून राधिकाने लाँग साडी नेसली आहे आणि अनंतने ब्लॅक सूट घालून क्लासी लुक पूर्ण केलाय. एकमेकांच्या बाहुपाशात प्रेम व्यक्त करत दोघांनी पोझ दिल्या आहेत. तर राधिकाने केस मोकळे सोडत न्यूड मेकअप लुक केलाय.
राधिकाचा क्लासी लुक
राधिकाचा हा लुक खूपच व्हायरल झाला असून तिने डायमंड आणि ब्लू खड्याचा नेकलेस घातला आहे. तिच्याकडे पाहून प्रिन्सेस डायनाची आठवण येतेय. तर राधिकाने तिचा हा लुक कमालीचा स्टायलिश पद्धतीने कॅरी केलाय. राधिकादेखील एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाहीये.