भांग सेवनाचे असतात अनेक फायदे आणि तोटे? जाणून घ्या
भांगमध्ये टेट्राहाइड्रोकॅन्नाबिनॉल (THC) असल्यामुळे शरीरातील जुना त्रास, गाठी किंवा मायग्रेन कमी होतो. भांग सेवनामुळे तणाव आणि चिंता कमी होऊन शरीराला आराम मिळतो, आणि ध्यानासाठी याचा उपयोग होतो.
भांग पचन प्रक्रिया सुधारते आणि भूक वाढवते, ज्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.
भांगचे अधिक सेवन केल्यास एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते.
जास्त प्रमाणात भांग सेवन केल्यास डिप्रेशनची शक्यता वाढते, तसेच हृदयाच्या धडधडीत वाढ होऊ शकते.
भांगाचे सतत सेवन केल्यास व्यसनाधीनता होण्याचा धोका असतो, ज्यामुळे शरीरावर आणि आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.