आपल्या आयुष्यात सतत आपल्या पार्टनरच्या (patner) चुका काढणारे कपल्स सतत भांडतच असतात. छोट्या छोट्या कारणांवरून यांची सतत भांडणे होत असतात. हे लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत तर फक्त समोरच्याची कशी चूक आहे हे दाखवतात. जर तुमच्या बाबतीतही असेच घडत असेल तर तुम्हाला आपल्या सवयी लगेचच बदलायला हव्यात.
नाहीतर तुमचे वैवाहिक(married) आयुष्य (life) धोक्यात येऊ शकते. कारण या लहान वाटणाऱ्या गोष्टी साचत गेल्या तर पुढे तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहू शकतात. त्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून तुम्ही प्रयत्न करायला हवेत. तुम्ही कोणते प्रयत्न करू शकता ते पाहुयात. सर्वात आधी लक्षात असू द्या की कोणीही परफेक्ट नसते. जर तुमच्या कडून काही चुका होत असतील तर तुम्ही त्या प्रामाणिकपणे मान्य केल्या पाहिजेत. तसेच तुमच्या पार्टनरकडून काही चुकत असेल तर त्यांना प्रेमाने (love)समजवायला हवे. कोणत्याही प्रकारचे भांडण न करता त्यांच्याशी प्रेमाने बोला. तुम्ही जर संयम दाखवला तर तुमच्या पार्टनरलाही तसेच संयमाने वागवेसे वाटेल.
तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही आणि तुमचा पार्टनर फक्त एकमेकांच्या चुका काढत असाल तर असे करणे लगेचच थांबवा. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त असंतोष भरून राहील. जर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर एक सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवन व्यतीत करू इच्छित असाल तर तुम्ही दोघांनीही एकमेकांचे फक्त दोष न दाखवता गुणांकडे लक्ष द्यायला हवे. कोणीही परफेक्ट नसते. पण आपण आपल्या संयमाने आपल्या नात्याला नक्कीच परफेक्ट बनवू शकता.
मागच्या भागात आम्ही तुम्हाला सांगितले की ज्याची चूक असेल त्याने ती प्रामाणिकपणे मान्य करायला हवी. तसेच तशी चूक आपल्या हातून पुन्हा घडणार नाही याची काळजीही घ्यायला हवी. जर समोरच्याची चूक असेल तर तुम्ही संयमाने आणि प्रेमाने ही परिस्थिती हँडल करून त्यांना त्यांची चूक दाखवून द्यावी. तुमचा वेळ (time) आणि प्रेम(love) पाहून तुमच्या पार्टनरलाही प्रेमाने वागवेच लागेल.
तुम्ही जर पार्टनरच्या चुका काढण्याच्या सवयीला कंट्रोल केले नाही तर ही सवय वाढतच राहील. जिथे तुम्हाला आज एक चूक दिसत आहे तिथे तुम्हाला दहा चुका दिसायला लागतील. या सवयीमुळे तुमच्या नात्याला तडा जाऊ शकतो. म्हणजे तुमची ही चुका काढण्याची सवय वेळीच कंट्रोल करा.