उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जांभळं (Jamun) मिळतात. ही काळ्या रंगाची जांभळं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. थंड असणारी जांभळं उन्हाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. जांभळांमध्ये अनेक गुणकारी पोषक घटक आढळून येतात. तसेच यामुळे मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात जांभूळ अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्यात जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. जांभूळ हे एक आयुर्वेदिक फळ आहे. जांभळांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी जांभूळ आणि जांभुळाची बी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात चला तर जाणून घेऊया.
रक्त शुद्ध करते:
जांभूळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. जांभुळाचा वापर अंतर्गत आणि बाहेरून देखील केला जातो. जांभुळाची साल खाल्ल्याने रक्त शुद्ध होऊन शरीराला फायदे होतात. रक्त आतून स्वच्छ करून बाहेरील त्वचा निरोगी राहते. रक्त शुद्ध असल्याने चयापचय चांगले राहून त्वचा सुंदर दिसते.
[read_also content=”तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या, दिसताहेत अॅसिडीटीची लक्षणे https://www.navarashtra.com/lifestyle/gallstones-is-increasing-in-the-youth-the-symptoms-of-acidity-are-appearing-538055.html”]
मधुमेहापासून आराम मिळतो:
मधुमेहाचा त्रास असेल्या रुग्णांनी जांभळाचे नियमित सेवन केले पाहिजे. यामध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात. जे रक्तातील साखर ३० टक्के कमी करण्यास मदत करतात. तसेच जांभळाच्या बियांमध्ये असलेले अल्कलॉइड रक्तातील साखर कमी करून मधुमेह नियंत्रित करतात.जांभळाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढते. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम जांभूळ करते. त्यामुळे अशक्तपणा कमी होऊन थकवा आणि कमजोरी जाणवत नाही.
मूळव्याधीच्या समस्यांपासून आराम मिळतो:
मूळव्याधीच्या समस्येमुळे अनेक लोक हैराण झाले आहेत. स्टूलमध्ये वेदना आणि रक्त आल्याने अस्वस्थतात जाणवते. ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे अशांनी २० मिली जांभूळ रसात थोडी साखर मिक्स करून प्यावे. हा उपाय दिवसातून ३ वेळा केल्याने मूळव्याधातील रक्तस्त्राव थांबतो.
[read_also content=”सकाळी उठल्यानंतर जाणवतोय तणाव? Depression वर अशी करा मात https://www.navarashtra.com/lifestyle/feeling-stressed-after-waking-up-in-the-morning-overcome-depression-like-this-538033.html”]
पिंपल्स दूर करण्यास मदत करते:
सर्वच महिला पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहेत. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर त्वचेवर डाग तयार होतात. हे डाग कितीही उपाय केले तरी जात नाही. ताणतणाव, हार्मोनल असंतुलन यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी जांभळाचा रस प्यावा. तसेच जांभूळ किंवा जांभूळाच्या पानाचा रस त्वचेवर लावल्याने पिंपल्स कमी होतात.