केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण
Hair Growth: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, वाढलेले प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच केस आणि त्वचेवर सुद्धा दिसून येत आहे. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या वाढतात आणि केस अतिशय विरळ दिसू लागतात. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक उत्पादने, हेअर कलर्स किंवा डाय इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते आणि केस निस्तेज वाटू लागतात.(फोटो सौजन्य – AI)
त्वचेप्रमाणे केसांची निगा राखणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अन्यथा केसांची वाढ थांबून शकते. केस मजबूत आणि घनदाट करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी जास्वदींच्या फुलांचा वापर करावा. जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म टाळूवरील त्वचेची निगा राखण्यास मदत करतात. त्यामुळे कोंडा दूर करण्यासाठी जास्वदींच्या फुलांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलांचा वापर करून हेअर टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले हेअर टोनर केसांच्या वाढीवर सकारात्मक ठरेल आणि केसांची थांबलेली वाढ पुन्हा होईल.
सुकवलेली जास्वंदी फुले
पाणी
स्प्रे बॉटल
जास्वदींच्या फुलांचे हेअर टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात सुवलेली जास्वदींची फुले किंवा पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर पाण्याला मंद आचेवर एक उकळी काढून घ्या. जास्वदींच्या फुलांचा अर्क पाण्यात मिक्स झाल्यानंतर रंग बदलू लागेल. तयार केलेले टोनर थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तयार केलेले टोनर फ्रिजमध्ये ठेवल्यास ८ ते १० दिवस व्यवस्थित टिकून राहील.
केस किंवा त्वचेसंबंधित कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करणे फार आवश्यक आहे. पॅच टेस्ट केल्यामुळे केसांना टोनर सूट होते की नाही हे समजून येईल. तयार केलेले टोनर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केस घनदाट होतात. टोनर लावल्यानंतर लगेच केस धुवून टाकू नये. टोनर १ तास तरी केसांमध्ये तसेच राहून द्यावे. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.






