केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत
Hair Care Tips: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरासोबतच केसांच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. केस गळणे, केस पातळ होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही, पण यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम दिसू लागतात. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महागडे हेअर सीरम, हेअर शाम्पू, कंडिशनर इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने वारंवार केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे केस खूप जास्त गळतात. त्यामुळे केसांना आवश्यक पोषण देण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
जवसाच्या छोट्या-छोट्या बिया शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये तुम्ही जवस बियांची पावडर मिक्स करून पिऊ शकता. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीन यांसारखे अनेक घटक असतात. शरीराला अवश्यक पोषण देण्यासाठी आहारात जवस बियांचे सेवन करावे.
सूर्यफुलाच्या बिया फक्त स्नॅक्स म्हणून नाहीतर शरीरासाठी खूप जास्त प्रभावी आहेत, म्हणून खाव्यात. या बियांमध्ये विटामिन ई, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले विटामिन ई शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी सूर्यफुलाच्या बिया खाव्यात.
तिळाचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तिळाचे लाडू, चिक्की किंवा इतर अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे बियांचे मिश्रण तयार करताना त्यात पांढऱ्या किंवा काळ्या तिळांचा आवजून समावेश करावा.
अतिशय लोकप्रिय असलेले चिया सीड्स शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी आणि पोटात थंडावा कायम टिकवून ठेवण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करावे.
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी ७ बियांचे तयार केलेले मिश्रण खावे. महिनाभर नियमित बियांचे सेवन केल्यास केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतील.
Ans: अंडी, दूध, दही, डाळी, कडधान्ये, सुका मेवा, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
Ans: केसांचा मुख्य घटक केराटिन हे प्रथिन आहे. आहारातून पुरेशी प्रथिने मिळाल्याने केसांची सामान्य वाढ आणि रचना टिकवण्यास मदत होते.
Ans: जीवनसत्त्वे A, C, D, E तसेच ब जीवनसत्त्वे आणि लोह, झिंक यांसारखी खनिजे शरीराच्या गरजेनुसार महत्त्वाची असतात.






