Palak Paratha Easy Recipe: तुम्हालाही नाश्त्यामध्ये काही तरी वेगळ आणि टेस्टी पदार्थ बनवायचा असेल तर ही पालक पराठा रेसिपी नक्की ट्राय करा.
Palak Paratha Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट
असा बनवा पालक-पनीर पराठा
प्रोटीन, चव आणि आरोग्य एकाच पदार्थात
सकाळच्या नाश्त्यात दररोज तेच पोहे, उपमा किंवा ब्रेड खाऊन कंटाळ येतो. पण रोजच्या नाश्त्याला काहीतरी चविष्ट आणि हेल्दी काय बनवायच असा प्रश्न सगळ्यांच पडतो. जर तुम्हालाही नवीन आणि हेल्दी पदार्थ कायच असेल तर प्रोटीनयुक्त पालक पराठे नक्की ट्राय करा. आयरनने भरपूर पालक, गव्हाचे पीठ आणि पनीर यांचा पौष्टिकतेने भरपूर हे पराठे चवीसोबत आरोग्याचीही फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे, सकाळच्या धावपळीतही हे पराठे घरी सहज तयार करता येतात. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठीही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात, हेल्दी आणि टेस्टी पालक पराठे बनवण्याची सोपी रेसिपी. (Palak Paratha Easy Recipe)
सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर गरम पाण्यात पालक एक ते दोन मिनिटे उकळवून घ्या आणि लगेच थंड पाण्यात ठेवा. पालकची पाने थंड झाल्यावर बाहेर काढून घ्या. यानंतर, पालक १ ते २ हिरवी मिरची आणि आलं यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे मिश्रण पेस्टसारखे तयार करा. त्यानंतर, एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. यामध्ये पालकाची पेस्ट, किसलेले पनीर, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. हे पीठ झाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता, तयार पिठाचे समान आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला कोरडे पीठ लावून पोळीप्रमाणे गोल लाटा. तवा गरम झाला की, तव्यावर पराठा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. त्यावर थोडे तूप किंवा तेल लावून सोनेरी खरपूस भाजा.गरमागरम पालक पराठे दही, पुदिन्याची चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी टिप्स
पालकची पेस्ट तयार करताना पाणी घालू नका आणि जास्त पातळ करू नका. अन्यथा पीठ चिकट होऊ शकते.
पराठे भाजताना मध्यम आचेचा वापर करा, त्यामुळे ते आतूनही चांगले शिजतील.
कमी तेलात पराठे भाजल्यास तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.