सकाळी उठल्यानंतर कायमचं डोकं दुखत? 'ही' लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष, आजारांपासून मिळेल सुटका
Hedache Causes: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी किंवा अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागते. डोकेदुखीचा परिणाम एकाग्रतेवर, मूडवर आणि दिवसभराच्या संपूर्ण कामावर होतो. अपुरी झोप, डिहायड्रेशन किंवा बिघडलेली दिनचर्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वारंवार सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. माइग्रेन, झोपेच्या समस्या किंवा जीवनशैलीतील बदलांचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. चला तर जाणून घेऊया सकाळी डोकेदुखी होण्याची कारणे, माइग्रेन आणि स्लीप ॲप्नियाचा संबंध काय, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Climate Change Breaking : २००८ पासून दररोज एक उष्णतेचे वादळ पृथ्वीवर आदळतंय ;नेमकं काय घडतंय ?
सकाळी उठल्यानंतर विविध कारणांमुळे डोकेदुखी होण्याची जास्त शक्यता असते. नियमित झोपेची वेळ, अपुरी झोप आणि वारंवार झोपमोड होणे इत्यादी अनेक कारणांमुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये डोकेदुखीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर, जास्त कॅफिन किंवा अचानक कॅफिन बंद केल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आणि प्रखर घाम, मद्यपान केल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो आणि संपूर्ण दिवस खराब होऊन जातो. वारंवार सकाळी डोकेदुखी, झोपेची वेळ, डोकेदुखीचा कालावधी, तीव्रता, औषधोपचार आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो.
तीव्र स्वरूपाची धडधडणारी वेदना
मळमळ
तीव्र डोकेदुखी
आवाजाची संवेदनशीलता
खाण्यापिण्याची इच्छा न होणे.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया हा झोपेसंबंधित गंभीर आजार आहे. ज्यामुळे झोपेत असताना श्वसनमार्ग वारंवार संकुचित होतो किंवा बंद पडल्यासारखा वाटतो. श्वासोच्छवासात खंड पडल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या पातळीत बदल होण्यास सुरुवात होते. पुरेशी झोप घेऊनही प्रचंड थकवा जाणवणे, दिवसभर झोप अनावर होणे, घोरणे, झोपेत अचानक श्वास अडकून जाग येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यानंतर वाढलेल्या डोकेदुखीमागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. झोपेत नकळत दात खाण्याच्या सवयीमुळे जबड्यावर आणि कण्यावर ताण येऊन सकाळी उठल्यानंतर कपाळाच्या बाजूला वेदना होऊ लागतात. तीव्र डोकेदुखी वाढल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. साधा किंवा मध्यम उच्च रक्तदाब सहसा डोकेदुखी निर्माण करत नाही, पण उच्च रक्तदाबाची पातळी वाढल्यानंतर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो आणि मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
Ans: सकाळी उठल्यानंतर डोके दुखण्यामागे झोप पूर्ण न होणे, शरीरात पाण्याची कमतरता, मायग्रेन, ताणतणाव, सायनसचा त्रास किंवा झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे (स्लीप ॲप्निया) अशी विविध कारणे असू शकतात.
Ans: वारंवार सकाळी डोके दुखणे हे मायग्रेन, स्लीप ॲप्निया किंवा इतर आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते. मात्र, केवळ डोकेदुखीवरून एखाद्या आजाराचे निदान करता येत नाही. नियमित त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: होय. अपुरी झोप, झोपेच्या वेळेतील अनियमितता आणि झोपेची गुणवत्ता खराब असणे यांमुळे काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.






