फोटो सौजन्य AI
पृथ्वीवर ६ जुलै २००८ पासून दररोज किमान एका ठिकाणी उष्णतेचे वादळ म्हणजेच हिट स्टॉर्म तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे . खासकरून ही मालिका १८ वर्षाहून अधिक काळ सुरु असून अद्याप खंडित झालेली नाही . हवामानातील वाढणारी अनिश्चितता , तापमानाचे विक्रम आणि तीव्र उष्णतेच्या घटनांमुळे संपूर्ण जगासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे .
उष्णतेचे वादळ म्हणजे केवळ एखाद्या शहरातील तापमान वाढणे न्हवे . एखाद्या प्रदेशात असामान्य आणि तीव्र उष्णतेची परिस्थिती निर्माण होऊन ती मानवी आरोग्य , पर्यावरण आणि रोजच्या जीवनासाठी धोकादायक ठरते ,तेव्हा अशा घटनांना व्यापक अर्थाने हिट स्टॉर्म म्हंटले जाते .
वाढते तापमान , दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा आणि वातावरणातील बदल यांचा यामध्ये समावेश होतो . अशा परिस्थितीत रात्रीचे तापमानही कमी होत नाही . त्यामुळे शरीराला दिवसभराच्या उष्णतेतून सावरण्याची संधी मिळत नाही . परिणामी उष्माघात आणि हृदयाच्या समस्या वाढण्याचा धोका अधिक निर्माण होतो .
जागतिक तापमान वाढीमुळे उष्णतेच्या तीव्र घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढत असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात . जीवाश्म इंधनाचा वाढता वापर , कोळसा आणि तेलाचे ज्वलन , जंगलतोड तसेच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे .
शहरांमधील काँक्रेटची बांधकामे , वाहनांची वाढती संख्या आणि झाडांचे कमी होणारे प्रमाण यामुळे शहरी भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवतो खासकरून रात्रीच्या वेळीही शहरांचे तापमान जास्त राहते . यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते .
उष्णतेच्या वाढत्या घटनांचा सर्वाधिक परिणाम शेती आणि नैसर्गिक संसाधनांवर होत आहे . पिकांना आवश्यक असलेल्या ओलाव्याचे प्रमाण कमी होते . जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन वाढते आणि सिंचनाची गरज अधिक निर्माण होते . परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढते . दुसरीकडे उष्णतेमुळे नद्या , तलाव अंडी धारणांमधील पाण्याच्या उप्लब्धतेवरही परिणाम होऊ शकतो .
कामगार , बांधकाम क्षेत्रातील आणि उन्हात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरते . पृथीवरील उष्णतेच्या घटनांची ही दीर्घ मालिका हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांकडे लक्ष वेधते . वाढते तापमान रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे , वृक्षारोपण ,अक्षय ऊर्जेचा वापर आणि ठोस विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे .






