
फळांचा राजा म्हणून जगभरात सगळीकडे आंब्याची (Mango) ओळख आहे. चवीला गोड असलेला आंबा सगळ्यांचं आवडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आंबा हे फळ आवडते. आरोग्याच्या दृष्टीने आंबा हे पौष्टिक आहे. यामध्ये पोटॅशियम, प्रथिने आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळून येतात. आंब्यांपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. मुरंबा, कैरीचे पन्ह, मेथांबा, आंब्याचा रायता यांसारख्या अनेक रेसिपी आंब्यापासून बनवल्या जातात. अनेकजण आंबा कापून खातात, तर अनेकांना आंब्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी खायला आवडतात. आज अशीच एक रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंब्यापासून मँगो चिली ड्रिंक कसे बनवायचे जाणून घ्या रेसिपी.
साहित्य:-
पिकलेल्या आंब्याची प्युरी
चिली फ्लेक्स
लिंबाचा रस
साखर
मीठ
सजावटीसाठी आंब्याचे काप
कृती:-
सर्वप्रथम आंब्याची प्युरी बनवण्यासाठी पाण्यामध्ये आंबा १० मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून आंब्याची साल काढून आंब्याचे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर त्यांची प्युरी करून घ्या. प्युरी करून झाल्यावर त्यात चवीनुसार साखर,चिली फ्लेक्स आणि बर्फाचे तुकडे , चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये लावून घ्या. नंतर एका मॉकटेल ग्लासच्या कडेला मीठ आणि चिली फ्लेक्स लावून त्यात मँगोचे ड्रिंक ओता. तयार आहे मँगो चिली ड्रिंक.