त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढून त्वचा काळी होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि थकल्यासारखी वाटते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही. ब्लॅक कॉफी किंवा फिल्टर कॉफीचे आवर्जून सेवन केले. कॉफीचा वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. कॉफीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट, कॅफीन आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म असल्यामुळे त्वचा सुंदर होण्यास मदत होते. त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कॉफीचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचाभर कॉफीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने कॉफीचा वापर केल्यास चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन नष्ट होऊन त्वचा उजळदार होईल.(फोटो सौजन्य – istock)
कॉफीमध्ये कॅफीक अॅसिड, क्लोरोजेनिक अॅसिड आणि पॉलीफेनॉल, अँटी-ऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कॉफी शरीरासाठी जेवढी फायदेशीर ठरते तितकीच फायदेशीर त्वचेसाठी सुद्धा असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त स्किन केअर वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा सुंदर दिसते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफ़िनमुळे त्वचेचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
उन्हामुळे किंवा चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे डेड स्किन वाढल्यास ती घालवण्यासाठी कॉफीचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. दोन ते तीन मिनिट मसाज केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळा तसाच ठेवून पाण्याने स्वच्छ त्वचा धुवून घ्या. यामुळे आठवडाभरात चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.
चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी कॉफी मास्क अतिशय फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. कॉफीमधील अँटी-ऑक्सिडेंट निर्जीव त्वचा पुन्हा एकदा फ्रेश करतात. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात दही, हळद टाकून पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ, माती आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हळदीच्या वापरामुळे पिंपल्समध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होईल.
बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा सुजल्यासारखी वाटते. अशावेळी कॉफी मास्कचा वापर करावा. कॉफीमधील क्लोरोजेनिक अॅसिड चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा कॉफी मधात मिक्स करून लावावी. यामुळे चेहऱ्यावर आलेली सूज कमी होण्यासोबतच त्वचा फ्रेश दिसेल.






