
चवीला आंबट, तुरट आणि गोड असणारा आवळा अनेकांना खायला फार आवडतो. आवळा हा अनेक आषधी गुणधर्मांची समृद्ध आहे. यात वात, पित्त, कफ असे तिन्ही शारीरिक दोष दूर करण्याची क्षमता आहे. आवळा हा आरोग्यासाठी फायदेशीर तर असतोच मात्र हा केसांसाठी आणि आपल्या चेहऱ्यासाठीही फायदेशीर ठरतो. आवळा हा एक फळ असून शतकानुशतके याला एक आयुर्वेदिक औषध म्हणून ओळखले जाते. आवळा हा चवीला स्वादिष्ट तर असतोच, त्याचबरोबर यात अनेक पोषकतत्वे ही आढळली जातात. आज आम्ही तुम्हाला याच आवळ्यापासून तयार होणाऱ्या काही घरगुती फेसपॅक विषयीची माहिती सांगणार आहोत.
आवळ्याचे फायदे:
हा आवळ्याचा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतो. आवळ्याचे अनेक फायदे आहेत. याच्या मदतीने केसांच्या तक्रारी दूर होतात आणि शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक वाढण्यास मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे चेहरा निस्तेज होण्यास आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम दूर करण्यास आणि त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात.
[read_also content=”आरोग्याबरोबरच चेहऱ्यासाठीही कोबी फायदेशीर! कोबीचा फेसपॅक कसा बनवायचा जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/along-with-health-cabbage-is-also-beneficial-for-the-face-knowing-how-to-make-cabbage-face-pack-534128.html”]
आवळा केसांसाठी फायदेशीर:
तुम्ही आवळा केसांसाठीही वापरू शकता. यात असलेले गुणधर्म तुमच्या केसांसाठी उपयुक्त ठरतात. आवळा केसगळती थांबवतो आणि केस दात बनवण्यास मदत करतो. याच्या मदतीने तुम्ही दाट आणि लांब केस मिळवू शकता. आवळ्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म केसांना नैसर्गिक चमक देतात आणि त्यांना मुलायम बनवतात.
आवळ्याचे सेवन करा: