फोटो सौजन्य: Freepik
सध्या देशभरात धोधो पाऊस पडत आहे, जयमाउळें रोगराई सुद्धा वाढत आहे. अश्यावेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात डेंग्यू होण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात असते, ज्याची सुरुवात होते ती डेंग्यूच्या तापापासून. डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होते. ही समस्या जर वेळीस रोखली नाही तर जीवघेणी सुद्धा ठरू शकते.
डेंग्यूचे सर्वात कॉमन लक्षण म्हणजे ताप. त्यामुळे बऱ्याच वेळा लोक सामान्य ताप आणि डेंग्यूचा ताप याला सारखेच मानतात. चला जाणून घेऊया या दोन्ही तापांमधील फरक आणि आपण घरबसल्या कसा हा ताप ओळखू शकतो.
डेंग्यू फिव्हर हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जो डासांमुळे पसरतो. उष्ण आणि दमट हवामानात या तापाचा धोका जास्त असतो. डेंग्यू झाल्यास खूप ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. डेंग्यूची काही प्रकरणे खूप गंभीर असू शकतात, ज्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्येही दाखल व्हावे लागते.
हेल्थ एक्सपर्टसच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला वर नमूद केलेल्या समस्या सतत जाणवत असतील तर हा सामान्य ताप नसून डेंग्यू ताप आहे, असे समजावे. डेंग्यूचा ताप 104 डिग्रीवर पोहचतो. तर व्हायरल ताप 103 डिग्रीच्या वर जात नाही.
जर तुम्हाला ताप खूप जास्त आहे आणि ब्लड टेस्टमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होत आहे तर तो सामान्य ताप नसून डेंग्यू आहे. अनेक केसेसमध्ये, ताप निघून गेल्यानंतर रुग्णामध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. यामध्ये पोटदुखी, सतत उलट्या होणे, वेगाने श्वास घेणे, थकवा, उलट्या होणे किंवा स्टूलमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. जर एखाद्या व्यक्तीस सामान्य ताप असेल तर औषधाच्या साहाय्याने तो 2-3 दिवसात बरा होतो.