Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थॅलॅसेमिया आणि लोहाच्या कमतरतेचा ऍनिमियातील फरक, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामुळे लाल रक्तपेशींचा आकार लहान होतो, त्यामुळे मायक्रोसायटोसिस होतो, इतकेच नव्हे तर लाल रक्तपेशींचा रंग देखील फिकट पडतो, याला हायपोक्रोमिक म्हणतात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2024 | 01:07 PM
थॅलॅसेमिया आणि लोहाच्या कमतरतेचा ऍनिमियातील फरक, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Follow Us
Close
Follow Us:

निरोगी लाल पेशी किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरेसे नसेल तर त्या स्थितीला ऍनिमिया म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लोहाची कमतरता हा सर्रास आढळून येणारा आजार असून, जवळपास ४०% मुले आणि ३०% वयस्क महिलांना हा त्रास आहे.

लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामुळे लाल रक्तपेशींचा आकार लहान होतो, त्यामुळे मायक्रोसायटोसिस होतो, इतकेच नव्हे तर लाल रक्तपेशींचा रंग देखील फिकट पडतो, याला हायपोक्रोमिक म्हणतात. मायक्रोस्कोपिक हायपोक्रोमिक ॲनिमियाचे एक महत्त्वाचे मिमिक म्हणजे थॅलेसेमिया, हा हिमोग्लोबिनचा अनुवांशिक रोग आहे. अल्फा आणि बीटा-थॅलेसेमिया असे याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया आणि थॅलेसेमिया या दोन्ही स्थितींमध्ये ऍनिमिया होतो. थकवा येणे, दमल्यावर नीट श्वास न घेता येणे अशी लक्षणे या दोन्हींमध्ये दिसून येतात. मायक्रोस्कोप आणि थेराप्युटिकल तपासण्यांमध्ये या दोन्हींचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी या दोन्हींमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

या दोन्हींमधील फरक साध्या रक्ततपासणीतून समजून येऊ शकतो आणि त्यानुसार उपचार ठरवले जाऊ शकतात.

  •  कम्प्लिट ब्लड काउंट – लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामध्ये हिमोग्लोबिन हे सामान्य पातळीपेक्षा कमी असते. तर थॅलेसेमियामध्ये लाल पेशींचे नुकसान होत असल्याने आणि जनुकीय दोषामुळे लाल पेशींचे उत्पादन अप्रभावी असल्याने लाल रक्तपेशींची संख्या तुलनेने जास्त असते.
  • सीरम लोह पातळी – लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ऍनिमियामध्ये लोहाची पातळी कमी असते आणि फेरिटिन आणि हेमोसिडिरिन हे लोह साठवून ठेवणारे प्रोटीन देखील कमी असतात. थॅलेसेमियामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या रक्त संक्रमणामुळे लोहाचा ओव्हरलोड होतो, त्यामुळे शरीरात लोह साठून राहते आणि अवयवांचे नुकसान होते. लाल पेशींच्या अप्रभावी उत्पादनामुळे लोह शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.

या तपासण्यांव्यतिरिक्त मायक्रोस्कोपखाली लाल रक्तपेशींची तपासणी करून आणि इलेक्ट्रोफोरेसिस वापरून हिमोग्लोबिनचे सेपरेशन/कॉन्सन्ट्रेशन करून आयडीए व थॅलेसेमियातील फरक अधिक अचूकपणे समजून येतो.

थॅलेसेमियाची पातळी प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असते. काहींच्या बाबतीत अजिबात लक्षणे दिसून येत नाहीत तर काहींच्या बाबत जीवघेणी परिस्थिती उद्भवल्यामुळे रुग्णाला रक्त संक्रमणावर अवलंबून राहावे लागते. लोहाच्या कमतरतेसारख्या न्यूट्रीशनल ऍनिमियामध्ये एलिमेंटल आयर्नसह सहजपणे उपचार करता येतात. तर थॅलेसेमियामध्ये उपचार करणे गुंतागुंतीचे ठरू शकते, यामध्ये वारंवार रक्त संक्रमण करावे लागते किंवा क्युरेटिव्ह थेरपी म्हणून डोनर स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट देखील करावे लागू शकते.

भारतामध्ये सध्या नॅशनल रजिस्ट्रीजचा अभाव असला तरी, थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे, याच्या रुग्णांची संख्या जवळपास १ ते १.५ लाख असून जवळपास ४५ मिलियन कॅरियर्स आहेत. डायग्नोस्टिक टेस्ट्स आणि प्रभावी अँटीनेटल स्क्रीनिंगमधील प्रगतीमुळे थॅलेसेमियावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. त्यामुळे थॅलेसेमिया सार्वजनिक आरोग्यावरील आणि अर्थव्यवस्थेवरील ओझे बनण्यापासून रोखले जाऊ शकते. दरवर्षी ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. २०२४ मध्ये या दिवसाची थीम ‘लोकांना सक्षम बनवणे, प्रगतीचा स्वीकार करणे – सर्वांसाठी समान व सहज उपलब्ध होतील असे थॅलेसेमियावरील उपचार उपलब्ध करवून देणे’ ही आहे.

Web Title: Difference between thalassemia and iron deficiency anemia learn expert opinion lifestyle nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2024 | 01:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.