एकटेपणा, ताणतणाव दूर करण्यासाठी तर कोणी लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी तर काहीजण करमणुकीसाठी पाळीव प्राणी पाळण्यास पसंती देतात. अधिकतर घरांमध्ये कुत्रा, मांजर, ससे यांसारखे प्राणी पाळले जातात. पाळीवप्राणी पाळणारे काहीजण स्वतःला पेट पॅरेंट्स देखील म्हणतात. मात्र कोणताही प्राणी घरात पाळला तर त्या प्राण्यासोबतच घरातील इतर सदस्यांच्या हायजिनची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. तेव्हा ज्यांच्या घरात पाळीवप्राणी आहेत अशांना घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी ‘व्हॅक्यूमक्लीनर’ हे यंत्र खूप उपयोगी पडते.
घरात पाळीव प्राणी असल्यामुळे अनेकदा त्यांचे जागोजागी पडणारे केस, त्यांचा कोंडा, गळालेली लाळ हे सामान्यतः डोळ्यांना पटकन दिसत नाही. पण सोफ्यावर, गादीवर ते पडलेले असतात. याला साफ करण्याचा त्रास पेट पालकांना होत असतो. तेव्हा यासर्व स्वच्छतेसाठी ‘व्हॅक्यूमक्लीनर’ हे उपयोगाचे आहे.
पाळीव प्राणी घरी असताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर यामुळे घरच्या माणसांना अॅलर्जी, श्वसनाचे आजार, अन्नातून पोटात गेले तर पोटाचे विकार, फूड पॉइझनिंग यासारखे आजार होऊ शकतात.