फोटो सौजन्य: Freepik
सध्या बदलत्या लाइफस्टाइल सोबत आपला आहार सुद्धा बदलत आहे. कित्येक जण घरात बनवलेल्या अन्नाऐवजी बाहेरचे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. या अशा सवयीनमुळेच आपल्या आरोग्यावर परिणाम होते. परिणामी आपल्याला नीट श्वास घेण्यास समस्या येऊ लागते.
आजकाल श्वास घेण्यास त्रास होणे सामान्य झाले आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक जणांना जास्त वेळ चालता येत नाही किंवा धावता येत नाही, पायऱ्या चढताना त्यांना दम लागतो. मात्र, काही वेळा खाण्या-पिण्यातल्या निष्काळजीपणामुळे श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया, असे कोणते पदार्थ आहेत ज्याचे सेवन श्वास घेण्यास समस्या येणाऱ्या लोकांनी टाळले पाहिजे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅसिइन नावाचे प्रोटीन असते, जे काही लोकांमध्ये श्वास घेण्यास त्रास निर्माण करू शकते. याशिवाय, या पदार्थांमुळे म्युकरसची निर्मिती वाढू शकते, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि श्वास घेणे कठीण जाते. दूध आणि त्याचे उत्पादन अशा लोकांनी टाळावे, ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.
हे देखील वाचा: ‘या’ 5 सवयींमुळे आपल्या नसांमधील रक्त कोरडे होते, वेळीच जाणून घ्या
अधिक प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. यामुळे श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो. जे लोक उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा श्वासाच्या समस्या अनुभवतात, त्यांनी आपल्या दैनंदिन आहारातील मीठाचे प्रमाण कमी केले पाहिजे.
मद्यपान केल्याने श्वसनमार्गातील स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होऊ शकते. याशिवाय, मद्यपान केल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शारीरिक श्रमानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच, श्वासाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी मद्याचे सेवन टाळावे.
सुपारीचा अतिसेवन केल्याने श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ शकते. सुपारीमुळे श्वसनमार्गात जलद सूज येऊ शकते, परिणामी श्वास घेणे कठीण होते. सुपारी खाण्याची सवय असलेल्या लोकांनी श्वासाच्या समस्या अनुभवल्यास तात्काळ तिचे सेवन बंद करावे.
महत्वाची सूचना: जर तुम्हाला श्वास घेण्यास समस्या येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य आहाराचे पालन करावे. त्यामुळे तुमचे श्वसन आरोग्य चांगले राहील.