राधिका मर्चंटची ओढणी
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात आता शेहनाई वाजण्यास सुरुवात झाली आहे. मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलगा अनंत अंबानी लवकरच आपली मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना आता सुरुवात झाली आहे. नुकतेच राधिकाने परिधान केलेल्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे. 8 जुलै रोजी मुंबईतील अनंत अंबानींच्या कुटुंबीयांच्या घरी, अँटिलिया येथे अनंत-राधिका यांचा हळदी समारंभ पार पडला. यात राधिकाने परिधान केलेली ओढणी चर्चेचा विषय बनली. ख्यातनाम फॅशनिस्टा रिया कपूरने स्टाईल केलेली, वधू-वधू कॉट्युअरर अनामिका खन्ना यांनी भरतकाम केलेल्या पिवळ्या लेहेंग्यात राधिका तेजस्वी दिसत होती.
या हळदी समारंभात राधिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा, काही दागिने आणि खऱ्याखुऱ्या फुलांपासून तयार करण्यात आलेली ओढणी परिधान केली होती. आता तिच्या या युनिक ओढणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा लूक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
फिल्ममेकर-स्टायलिस्ट रिया कपूरने डिझायनर अनामिका खन्ना यांच्या दुल्हनच्या कॅनरी यलो (canary yellow) एम्ब्रॉयडरी लेहेंगाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुंबईतील सृष्टी कलकत्तावाला हिने राधिकासाठी ही सुंदर फुलांची ओढणी तयार केली आहे. सोशल मीडियावर तिचा हा लूक ट्रेंड होऊ लागल्यावर लगेचच तिच्याकडे नववधूंककडून या ओढणीची मागणी होऊ लागली. “काही जण अगदी तसाच दुपट्टा मागत आहेत, तर काहींना त्यांच्या आवडीनुसार तो त्यात बदल करायचा आहे,” असे सांगितले.
राधिकाच्या ही ओढणी तयार करण्यासाठी जवळपास 2 किलो पिवळ्या झेंडूच फुले आणि ताज -सुगंधी तगरच्या कळ्यांचा वापर करण्यात आला. याबद्दल बोलताना कलकत्तावाने सांगितले की, तिला ओढणी डिझाइन करण्यासाठी फक्त एक दिवसाचा वेळ मिळाला. ही ओढणी तयार करण्यासाठी पाच करिगारांना सहा-सात तास लागले.”
हिंदुस्थान टाईमच्या माहितीनुसार, राधिकाची फुलांची ओढणी तयार करण्यासाठी हजारो तगरच्या कळ्या आणि 2 किलो झेंडूची फुले वापरण्यात आली. अशा ओढण्यांची किंमत ₹15,000 रुपयांपासून चालू होते. राधिकाने परिधान केलेल्या ओढणीसह तिच्या आउटफिटमध्ये ताज्या पांढऱ्या तगर कळ्यांपासून बनवलेल्या, दागिन्यांमधील कानातले, टॉप्स, चोकरसह दुहेरी नेकलेस, हातफुल (हाताचे दागिने) आणि फुलांचे कलीरे यांचा समावेश पाहायला मिळाला, ज्यांची किंमत ₹ 27,000 इतकी आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सृष्टीने सांगितले की, रिया कपूरच्या टीमने समारंभाच्या आदल्या दिवशी तिच्याशी संपर्क साधला त्यामुळे ही ओढणी तयार करण्यासाठी त्यांच्याकडे फार कमी वेळ होता. वेळेची कमतरता असतानाही, सृष्टी आणि तिच्या पाच जणांच्या टीमने अवघ्या सहा तासांत अप्रतिम दागिन्यांचा सेट पूर्ण केला.