Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला सुद्धा अंधुक दिसतं का? मग आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश एकदा करून पाहा

हल्लीच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना अंधुक दिसायला चालू झाले. यामागे सर्वात मोठे कारण हे मोबाईलचा अतिवापर आहे. जास्त स्क्रीन टाइमचा वाईट परिणाम हा जास्तकरून आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळेच दृष्टी सुधारण्यासाठी आणि रोगांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 22, 2024 | 08:49 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक जण मग लहान असो कि मोठा, सगळेच जण मोबाईल किंवा लॅपटॉपवर तासंतास वेळ घालवत असतात. यामुळे शरीराची हालचाल होत नाही, परिणामी लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. पण ही तर झाली एक समस्या. अशा कित्येक समस्या आहेत ज्याचे कारण मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाढणारा स्क्रीन टाइम आहे. यातीलच एक समस्या म्हणजे डोळ्यांची दृष्टी कमी होणे. पण उत्तम आहार तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे.

हे देखील वाचा: जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लसणाचे सेवन करत असाल, तर जाणून घ्या तोटे

अनेक संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की झिंक, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीन समृध्द अन्न खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित जोखीम 25% कमी होऊ शकतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, झेक्सॅन्थिन, ल्युटीन आणि बीटा कॅरोटीन हे देखील डोळ्यांसाठी उत्तम अन्न आहेत. अशा परिस्थितीत, दृष्टी सुधारण्यासाठी आहारात काय समाविष्ट केले पाहिजे त्याबाबद्दल आपण पुढे जाणून घेऊया.

शेंगदाणे आणि शेंगा: शेंगदाणे आणि शेंगा झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सीडन्ट्सने भरलेले असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. या पदार्थांमुळे डोळ्यांना पोषण मिळतो आणि दृष्टीला धार येते.

आंबट फळं: आंबट फळं जसे की संत्री, पेरू आणि कीवी मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतो. व्हिटॅमिन सी डोळ्यांची सुरक्षा करण्यास मदत करतो आणि मोतियाबिंदासारख्या रोगांपासून संरक्षण प्रदान करतो.

हिरव्या पालेभाज्या: पालक, मेथी आणि कोलार्ड ग्रीन्स या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांनी डोळ्यांच्या उत्तेजनास मदत होते आणि त्यांची सुरक्षा केली जाते.

हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी या खास मसाल्याचे प्या ड्रिंक, सकाळी उठताच फास्टिंग शुगर येईल झर्रकन खाली

अंडी: अंड्यांमध्ये झिंक, ल्युटीन, आणि विटॅमिन बी12 असतो, ज्यामुळे डोळ्यांचा आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते.

मासे: सॅल्मन, मॅकेरेल आणि टुना सारख्या मासांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् मोठ्या प्रमाणात असतात. हे फॅटी ऍसिडस् डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सूजन कमी करतात.

या सर्व पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करून आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि दृष्टीला अधिक चांगले होऊ शकतो. त्यामुळे, स्क्रीनवरील वेळ कमी घालवण्यासोबतच, योग्य आहाराच्या मदतीने आपल्या डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करा आणि नेहमी चांगल्या सवयीचा अवलंब करा.

Web Title: Do you see blurry too then try including these foods in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 08:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.