अनेकदा फिरायला जायचे म्हटलं की कुठे जायचं? असा प्रश्न सर्वांना पडत असतो. आपला भारत देश अनेक निसर्गरम्य ठिकाणांची समृद्ध आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे एकदा तरी जाऊन भेट दिली पाहिजे. तुम्ही भव्य पर्वत, नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, समुद्रकिनारे, गजबजणारी शहरे आणि शांत ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या वास्तूंचा आनंद घेऊ शकता. तुम्ही सुद्धा मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.
काश्मीर
काश्मीर सारखी जागा अवघ्या भारतात दुसरी नाही. फिरायला जाण्यासाठी काश्मीर एक बेस्ट ठिकाण आहे. शहराची शांतता आणि सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही मित्रांसोबत, कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काश्मीरला जाऊ शकता. येथे नद्या, नयनरम्य धबधबे, दऱ्या आणि हिरवीगार जंगले पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. काश्मीरचे संपूर्ण वातावरण तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल.
[read_also content=”Travelनिर्सगाच्या कुशीत लपलेल्या महाराष्ट्रातील ‘या’ सुंदर तलावांना नक्की भेट द्या https://www.navarashtra.com/lifestyle/be-sure-to-visit-these-beautiful-lakes-in-maharashtra-hidden-in-the-lap-of-nirsga-nrsk-532530.html”]
आसाम
हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्र व बराक नदीच्या खोऱ्यांत आहे. अनेक पर्वत आणि समुद्र किनाऱ्यांनी वेढलेले आसाम राज्य आहे. निसर्गसौंदर्य पाहायचे असल्यास आसाम एक चांगला पर्याय ठरेल. आध्यात्मिक वातावरणात सुखदायक सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही आसाममध्ये जाऊ शकता. आसाममध्ये तुम्हाला अनेक वन्यजीव अभयारण्ये देखील पाहायला मिळतील.
मनाली
मनाली देखील फिरण्यासाठीचे एक उत्तम ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. जर तुम्ही मित्रांसोबत मनाली याठिकाणी जात असाल तर, तुमच्या आयुष्यातील ही बेस्ट ट्रिप ठरु शकते. बियास नदी, सभोवतालचे पर्वत, आल्हाददायक हवामान आणि सौंदर्याने मनाली पर्यटकांची मने जिंकते.
जैसलमेर
जैसलमेर शहराचं सौंदर्य देखील फार सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. जैसलमेर हे राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण भव्य किल्ले, वाळवंट आणि मंदिरांकडे आकर्षित करते. तुम्हाला महान शासकांच्या काही भव्य वाड्यांबद्दल या ठिकाणी जाऊन घेता येईल. कुटुंबासोबत फिरण्यासाठी जैसलमेर उत्तम पर्याय आहे.
कुर्ग
जर तुम्हाला रोजच्या जिवनाचा आणि शहरांच्या गजबजाटापासून दूर राहायचं असेल तर कुर्ग एकमेव ठिकाण आहे. कुर्ग हिरवाई आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. कर्नाटकच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले कूर्ग हे अतुलनीय सुंदर हिरवेगार आणि कॉफीचे उत्पादन करणाऱ्या हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे.