लसूण (Garlic) तिच्या औषधी गुणधर्मामुळे ओळखली जाते. लसणीत अनेक गुणधर्म आढळून येतात. लसूण कच्चा खाणे, लसणापासून बनलेले पदार्थ खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. लसणाचा वापर मुख्यता जेवणाच्या पदार्थांमध्ये केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. यामध्ये असलेल्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्समुळे पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. शरीरातील अनेक आजारांवर लसूण गुणकारी आहे. लसूण हे एक कंदमूळ आहे. लसूण उत्पादनात जगामध्ये चीननंतर भारताचा नंबर लागतो. लसणापासून चहा देखील बनवला जातो. हा चहा पिल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात.
लसणीचा चहा पिण्याचे फायदे
लसणीचा चहा पिल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. लसणामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी आढळून येतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. रक्तदाब नियंत्रित राहिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास देखील लसूण प्रतिबंधक आहे. यामुळे स्ट्रोकचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर कमी होतो. लसणीचा चहा पिल्याने वजन नियंत्रणात राहते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी लसणीचा चहा प्याला जातो. यामुळे हळूहळू वजन कमी होते.
लसणाचा चहा कसा बनवतात?
लसणाचा चहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी ३ ते ४ लसूण घेऊन त्याची साल सोलून घ्या. त्यानंतर या लसणीच्या पाकळ्या चेचून घ्या. लसूण चेचून झाल्यानंतर १ काप पाणी एका छोट्या टोपामध्ये घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर पाण्यात लसूण पाकळ्या घाला आणि ५ मिनिटे उकळवून घ्या.उकळवून झाल्यानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात आल्याचा रस आणि मध टाका. हे सर्व गाळणीने गाळून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून हा चहा तुम्ही गरम किंवा थंड करून पिऊ शकता.