(फोटो सौजन्य: Pinterest)
लिपबाम लावण्याआधी मॉइश्चरायझर लावा
तज्ज्ञांच्या मते, कोरड्या ओठांवर डायरेक्ट लिपबाम लावणे काही योग्य नाही. यासाठी प्रथम ओठांवर मॉइश्चरायझर लावावा आणि यानंतर ओठांवर लिप बाम लावावा. यासाठी हलके आणि सुगंधरहित मॉइश्चरायझरची निवड करा.
वारंवार ओठांवर जीभ लावू नका
ओठ कोरडे झाल्यानंतर अनेकजण आपली जीभ ओठांवर लावतात. तज्ज्ञांच्या मते, ओठांवर जीभेचा स्पर्श केल्याने कोरडेपणाची ही समस्या आणखी वाढू शकते. जीभेवर तोंडातील लाळ असते जी ओठांच्या नाजूक त्वचेवर परिणाम करत असते. यामुळेच आपल्या जीभेला वारंवार ओठांवर स्पर्श करणे टाळावे.
मॅट लिपस्टीकचा वापर कमी करा
त्वचा तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ओठांवर मॅट लिपस्टीकचा जास्त प्रमाणात किंवा डेली वापर करत असाल तर ओठ कोरडे होण्याची तुमची समस्या वाढू शकते. कोरड्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी काही दिवस ओठांवर मॅट लिपस्टीकचा वापर टाळा. याऐवजी तुम्ही ओठांवर ग्लाॅसी किंवा मॉइश्चरायझिंग लिपस्टिकचा वापर करु शकता.
रात्री झोपण्यापूर्वी हे काम करा
शेवटी त्वचा तज्ज्ञाच्या मते, कोरड्या ओठांना ठिक करण्यासाठी झोपण्यापूर्वी चांगल्या प्रमाणात ओठांवर मॉइश्चरायझर लावून झोपावे. यानंतर ओठांवर थोडी पेट्रोलियम जेली लावावी. पेट्रोलियम जेली ओठांवर एक पातळ थर तयार करते ज्यामुळे रात्रभर ओठांवर ओलावा टिकून राहतो आणि ओठ कोरडे होत नाहीत. यामुळे ओठ मऊ राहण्यास मदत मिळते.






