कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा 'हे' पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
Skin Care Tips: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक ऊन पडत आहे. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीरासोबतच त्वचेसंबंधित समस्या सुद्धा वाढू लागतात. कडक उन्हात बाहेर १० मिनिटं तरी फिरून आल्यानंतर त्वचा पूर्णपणे काळी पडून जाते आणि चेहऱ्यावर टॅन वाढतो. यासोबतच त्वचेवर उष्णता, घाम आणि प्रदूषणाचा परिणाम सुद्धा दिसू लागतो. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंग, निस्तेजपणा आणि तेलकटपणचा कंटाळा आल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात तर काहीवेळा वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे फारकाळ चेहऱ्यावर ग्लो टिकून राहत नाही. वारंवार महागड्या केमिकलचा वापर करण्याऐवजी दह्याचा वापर करून घरीच फेसपॅक तयार करावा. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी दह्याचा वापर करावा. दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. दह्याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावर वाढलेले टॅन कमी होण्यासोबतच उष्णता कमी होते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावर ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी दह्याचा वापर करावा. दही अतिशय सौम्य असल्यामुळे कोणताही जडपणा जाणवत नाही.
फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दही घेऊन त्यात हळद, बेसन आणि कॉफी पावडर टाकून मिश्रण मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून घ्या. फेसपॅक लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावा आणि १५ ते २० मिनिटं चेहऱ्यावर तसाच ठेवा. हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा चेहऱ्यावर फेसपॅक लावल्यास टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
फेसपॅक बनवताना दही कायमच ताजे घ्यावे. ताज्या दह्याचा वापर केल्यास चेहरा फ्रेश राहतो. आंबट किंवा शिळे दही घेतल्यास त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. कोणताही नवीन फेसपॅक किंवा फेसमास्क लावण्याआधी पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर जळजळ, लालसरपणा किंवा खाज होत असल्यास फेसपॅक लावू नये. चेहऱ्यावर ॲक्टिव्ह पिंपल्स किंवा जखमा असतील तर दह्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू नये.
Ans: सूर्याच्या अतिनील (UV) किरणांमुळे त्वचेत मेलॅनिनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो आणि टॅनिंग दिसू लागते.
Ans: साधे, साखर न घातलेले दही त्वचेवर काही वेळ लावल्याने त्वचेला थंडावा आणि मऊपणा जाणवू शकतो. मात्र, टॅनिंग पूर्णपणे दूर होते, याचा ठोस पुरावा नाही.
Ans: दह्यामध्ये थोडे ओट्स मिसळून सौम्य फेस पॅक तयार करता येतो. संवेदनशील त्वचा असल्यास आधी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करावी.






