Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात कधी साजरी होणार ईद? तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

ईद-उल-फित्र किंवा ईद हा मुस्लिम समाजाचा मुख्य सण आहे. याविषयी एक समजूत आहे की, या दिवशी पैगंबर हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता. या आनंदात दरवर्षी ईद साजरी केली जाते.

  • By साधना
Updated On: Apr 17, 2023 | 01:37 PM
ramadan eid

ramadan eid

Follow Us
Close
Follow Us:

रमजानचा महिना 24 मार्चपासून सुरू झाला आहे. रमजान (Ramadan) महिन्यात 29 किंवा 30 दिवस उपवास ठेवला जातो. त्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो. याला ईद-उल-फित्र (Eid Ul Fitr 2023)असं म्हटलं जातं. ईद हा मुस्लिम समाजातील लोकांसाठी सर्वात विशेष सण आहे. त्यामुळे प्रत्येक जण ईद सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे रमजानचा महिना चंद्रदर्शनानंतर सुरू होतो, त्याचप्रमाणे रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी केली जाते.

[read_also content=”अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर?, शरद पवारांच्या आशीर्वादासाठी होतायेत प्रयत्न? दिल्लीत अमित शाहांशी डीलही फायनल? https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-will-be-chief-minister-in-maharashtra-sharad-pawar-and-amit-shah-meeting-in-delhi-386230.html”]

ईद-उल-फित्र
ईद-उल-फित्र इस्लामिक कॅलेंडरच्या 10 व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर साजरी केली जाते. चंद्र दिसल्यानंतरच ईदची नेमकी तारीख ठरवली जाते. सर्वप्रथम सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसल्याची घोषणा होते. यानंतर जगभरातील मुस्लिम समुदायाचे लोक ईद साजरी करतात.

यावर्षी कधी आहे ईद?
पाकिस्तानमध्ये 22 एप्रिल रोजी ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतातही या तारखेला ईद साजरी होण्याची दाट शक्यता आहे. पण भारतात 23 एप्रिललाही ईद साजरी केली जाऊ शकते कारण अरब देशांसह पाकिस्तानमध्ये 23 मार्चपासून रमजानचा महिना सुरू झाला आहे. त्याच वेळी, 24 मार्चपासून भारतात रमजान महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत जर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी झाली तर रमजानचे केवळ 29 उपवास पूर्ण होतील. त्याचबरोबर पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये रमजानचे 30 दिवस पूर्ण होतील. मात्र 29 दिवस उपवास करूनही ईद साजरी करता येते.

अशा परिस्थितीत 21 एप्रिलला चंद्र दिसल्यास 22 एप्रिलला ईद साजरी केली जाईल आणि 22 एप्रिलला 30 दिवस उपवास केल्यानंतर 23 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. जर भारतातील रोजेदार 29 दिवस उपवास करतात तर ईद 22 एप्रिलला असेल आणि 30 दिवस उपवास ठेवल्यास ईद 23 एप्रिलला असेल.

22 एप्रिलला भारतात ईद साजरी होण्याची शक्यता किती आहे ?
इस्लामिक कॅलेंडर 29 किंवा 30 दिवसांचे असते. 2021 आणि 2022 मध्ये इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान महिना 30 दिवसांचा होता. वर्ष-दर-वर्षाचा आकडा बघितला तर, या वर्षी रमजान 30 दिवसांचा असेल, तर पुढच्या वर्षी 29 दिवसांचा असेल अशी माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत, या वर्षी 2023 मध्ये रमजान 29 दिवसांचा असेल आणि भारतात 22 एप्रिल रोजी ईद साजरी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

23 एप्रिल रोजी भारतात ईद होण्याची शक्यता किती आहे?
शेजारील पाकिस्तानमध्ये ईदसाठी 22 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतात 23 एप्रिलला ईद साजरी होण्याची फारशी शक्यता नाही. मात्र, अरब देशांमध्ये 21 एप्रिलला चंद्र दिसत नसेल तर 23 एप्रिलला ईद साजरी केली जाऊ शकते.

महत्त्व
ईद-उल-फित्र किंवा ईद हा मुस्लिम समाजाचा मुख्य सण आहे. याविषयी एक समजूत आहे की, या दिवशी पैगंबर हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता. या आनंदात दरवर्षी ईद साजरी केली जाते. इ.स. 624 मध्ये पहिल्यांदा ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली असे म्हणतात. आनंद, शांती, सद्भावना आणि बंधुभाव वाढवण्यासाठी ईद सणाचे महत्त्व आहे. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, नमाज वाचतात, मिठी मारतात, गोड शेवया खातात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.

Web Title: Eid ul fitr 2023 what is the date of ramadan eid this year nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2023 | 01:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.