रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहिलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! रोजच्या जेवणात करा 'या' चटणीचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
लसूण चटणी बनवण्याची सोपी कृती:
लसूण चटणी खाण्याचे फायदे:
कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि हृद्यासंबंधित इतर आजारांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून गेले आहे. हल्ली तरुण वयातील मुलामुलींसुद्धा हार्ट अटॅक येऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आहारात सतत तिखट किंवा तेलकट, पॅक बंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर खूप जास्त भीती निर्माण होते. पण पूर्णपणे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक नाही. मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाबाचा धोका सुद्धा वाढतो. खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहते. ज्याच्या परिणामामुळे श्वास घेताना आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या चटणीचा समावेश करावा. चटणीच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, जिरं आणि मोहरीचे तेल घालून चटणी वाटून घ्या. चटणी बनवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. यामुळे चटणी लवकर खराब होण्याची जास्त शक्यता असते. लसूण चटणी रोजच्या जेवणात अर्धा चमचा घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच शरीर स्वच्छ होईल. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी एक किंवा दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात.
रोजच्या आहारात लसूण चटणीचा समावेश करावा. लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा घटक आढळून येतो. अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेली लसूण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे नियमित लसूण चटणी किंवा लसूण पाकळी चावून खावी. लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी लसूण खावा. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि आरोग्य सुधारते.
रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ झाल्यास हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहील. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी लसूण खावा. कारण लसूणमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते. लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी लसूण खावा. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते.
Ans: केवळ एखादी चटणी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नष्ट होत नाही. मात्र फायबरयुक्त आणि हृदयासाठी योग्य पदार्थांचा संतुलित आहाराचा भाग म्हणून समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणास मदत होऊ शकते.
Ans: एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉलला सामान्यतः ‘खराब कोलेस्ट्रॉल’ म्हटले जाते. त्याचे प्रमाण जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Ans: ओट्स, कडधान्ये, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्यांपासून बनवलेले पदार्थ आणि नट्स यांसारखे फायबरयुक्त पदार्थ संतुलित प्रमाणात आहारात घेता येतात.






